विद्यार्थी वाहतूकदारांच्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष
बारामतीत संघटनेचे उपोषण
बारामती वार्तापत्र
राज्यात मार्चपासून कोरोणा महामारी मुळे सर्व शाळा बंद होत्या त्यामुळे राज्यातील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्थानिक संघटनांनी वेळोवेळी राज्य शासनाला पत्रव्यवहार करून संघटनेने वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या. मात्र शासनाने वाहतूक संघटनेच्या एकाही मागणीचा विचार केला नाही किंवा दखल घेतली नाही त्यामुळे त्यामुळे विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. विद्यार्थी वाहतूकदारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी,,, स्कूल बस बंद असल्यामुळे परिवहन विभागाने टॅक्स पासिंग फि माफ करावी,, बँक व फायनान्स कर्जाची मुदत वाढवून मिळावी व त्यावरील दंड व्याज माफ करावे ,,,दहा महिने वाहतूक व्यवसाय बंद असल्यामुळे चालक मालक व अटेंडर यांना आर्थिक मदत मिळावी,,, इन्शुरन्स लॉक डाउन कालावधीतील मुदत पुढे वाढवावी ,,,शाळा सुरू झाल्यावर परिवहन कार्यालयामध्ये स्कूलबस साठी शंभर रुपये घेऊन समतोल ठेवावा व रजिस्ट्रेशन साठी शाळेने संमतीपत्र देऊन सहकार्य करावे या मागण्यांबाबत विचार करावा असेही निवेदनात म्हटले आहे.
विरोधी पक्ष नेते व भाजप शहराध्यक्ष यांचा आंदोलनास पाठिंबा
दरम्यान या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी बारामती नगर परिषदेचे नगरसेवक, विरोधी पक्षनेते सुनील सस्ते बारामती शहर भाजपाचे अध्यक्ष सतीश फाळके यांनी विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या आंदोलनास पाठिंबा देऊन आंदोलकांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही कार्यकर्ता या उपोषणाच्या ठिकाणी आला नाही याची खंत देखील उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली.