विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय बारामती येथील विद्युत विभागातर्फे आयोजित “प्रकल्प आणि पोस्टर सादरीकरण स्पर्धा” यशस्वी संपन्न.
उदिष्ट्ये विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती जागृती

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय बारामती येथील विद्युत विभागातर्फे आयोजित “प्रकल्प आणि पोस्टर सादरीकरण स्पर्धा” यशस्वी संपन्न.
उदिष्ट्ये विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती जागृती
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय बारामती येथील विद्युत अभियांत्रिकी विभाग, इलेक्ट्रिकल स्टुडंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १४ मे २०२२ सकाळी १० ते १.३० या वेळेत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “प्रोजेक्ट आणि पोस्टर सादरीकरण स्पर्धा” आयोजित केली होती. ELESA) आणि ISTE) अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल व्हेईकल्स, मायक्रोग्रीड, रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस, IOT, आणि स्विच गीअर्स यांसारख्या विविध संशोधन क्षेत्रातील पोस्टर्स आणि प्रोजेक्ट्स सिम्युलेशन आणि हार्डवेअरच्या निकालांच्या स्वरूपात सादर केले. या कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर, यांनी रिबन कापून व श्री गणरायाच्या प्रतिमेचे पूजन करून केले.
या कार्याक्रमासाठी डॉ. अनिल हिवरेकर, विद्युत विभागाचे विभाग प्रमुख श्री. रोहित तरडे, श्री. शिवाजी रासकर, वैशाली देवकाते, पूजा जैस्वाल, श्री. हाफिज शेख, श्री. बाळासाहेब देवकाते-पाटील, श्री. दिपक येवले, श्री. पी. डी. उपाध्ये, श्रीमंती रोकडे, प्रसारमाध्यम विभागाचे सुनिल भोसले, तसेच ELESA चे सर्व समन्वयक, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागातील सर्व प्राध्यापक या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अंतिम वर्षाच्या विद्युत अभियांत्रिकीच्या २३ प्रकल्प गटाने सहभाग नोंदविला होता.
यासाठी तज्ञ प्राध्यापकांनी पोस्टर्स, प्रकल्प कल्पना, सादरीकरणे आणि अहवालांच्या गुणवत्तेवर आधारित इलेक्ट्रिकल विभागातील प्रकल्पांचे मूल्यमापन केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समन्वक श्री. शिवाजी रासकर व वैशाली देवकाते यांनी विशेष योगदान दिले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. श्री. रा. स. बिचकर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचे मुख्य उदिष्ट्ये विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती जागृती व्हावी तसेच त्यांच्यामधील सुप्त गुणांचा विकास होऊन त्यांच्या मधून उद्याचे भावी संशोधकवृतीचे अभियंते तयार व्हावेत हा होता. या स्तुत्य उपक्रमाचे संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष श्री. अशोक प्रभुणे, सचिव निलीमाताई गुजर, खजिनदार श्री. युगेंद्र पवार, विश्वस्त डॉ. राजीव शहा, श्री, मंदार सिकची, श्री. किरण गुजर, रजिस्टार श्री. श्रीश कंभोज या सर्वांनी विशेष कौतुक केले.