विद्या प्रतिष्ठानचे व्हीपीकेबी आयईटी, बारामती मुलींच्या सॉफ्टबॉल संघाने अंतर महाविद्यालयीन स्पर्धेत तृतीय क्रमांक व दोन विद्यार्थिनींची पुणे जिल्हा क्रीडा विभागाच्या टीममध्ये निवड
65 खेळांमधून महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींची पुणे जिल्हा क्रीडा विभागाच्या टीममध्ये निवड

बारामती वार्तापत्र
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत व पुणे जिल्हा क्रीडा विभागीय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने एस बी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, इंदापूर येथे अंतरमहाविद्यालयीन सॉफ्टबॉल मुलींच्या स्पर्धा 5 जानेवारी 2025 रोजी पार पडल्या. या स्पर्धेसाठी एकूण सहा संघांनी व 65 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेमध्ये कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी, बारामती या महाविद्यालयाच्या सॉफ्टबॉल संघाने या तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच या 65 खेळांमधून महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींची पुणे जिल्हा क्रीडा विभागाच्या टीममध्ये निवड झालेली आहे. या स्पर्धा यशस्वी होण्याकरता महाविद्यालयाची क्रीडा प्रमुख डॉ. बिपिन पाटील तसेच क्रीडा प्रशिक्षक संतोष जानकर यांनी विशेष कष्ट घेतले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रभारी डॉ. सुधीर लांडे तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी यांनी मुलींच्या सॉफ्टबॉल संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.