शैक्षणिक

विद्या प्रतिष्ठानचे व्हीपीकेबी आयईटी, बारामती प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांची वार्षिक पालक सभा यशस्वी संपन्न

कार्यक्रमाचा उद्देश हा विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद घडावा

विद्या प्रतिष्ठानचे व्हीपीकेबी आयईटी, बारामती प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांची वार्षिक पालक सभा यशस्वी संपन्न

कार्यक्रमाचा उद्देश हा विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद घडावा

बारामती वार्तापत्र

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची पालकसभा १२ एप्रिल २०२5 रोजी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य व व्यासपीठावरील मान्यवरांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी पालकांचे प्रतिनिधी म्हणून लाभलेले श्री. अमोल निंबाळकर व महिला पालक प्रतिनिधी लता बाबर यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे व अन्य मान्यवर यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला.

प्रथम सत्रामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळविले अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

महाविद्यालयाचे शैक्षणिक अधिष्ठता डॉ. सचिन भोसले, महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. सुरज कुंभार तसेच प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखेचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनिल डिसले या सर्व विभाग प्रमुखांनी प्रथम सत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी जे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा विषयी तसेच प्लेसमेंट करिता जे उपक्रम राबविले गेले व त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जो सक्रिय सहभाग घेतला याची इत्थंभूत माहिती दिली.

तसेच स्वायत्त महाविद्यालय म्हणजे काय? तसेच या महाविद्यालयांना अभ्यासक्रमामध्ये योग्य ते बदल घडविण्याचा अधिकार असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा कसा फायदा होतो याविषयीची संपूर्ण माहिती अत्यंत चांगल्याप्रकारे समजेल अशा ओघवत्या भाषेत प्रमुख मान्यवर प्राध्यापकांनी सांगितली.

प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांनी आपल्या भाषणात या महाविद्यालयात गेली पाच वर्षात महाविद्यालयाने केलेली उत्कृष्ट कामगिरी तसेच काम करीत असताना येणाऱ्या अडचणी व त्यावर केलेली मात याचा ऊहापोह केला. या संपूर्ण कार्यक्रमाचा उद्देश हा विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद घडावा, यांच्यामध्ये समन्वय असावा व आपल्या पाल्याची प्रगती हि पालकांना कळावी त्याचबरोबर आपल्या पाल्याच्या सर्वागीण विकासासाठी महाविद्यालय कोणकोणते उपक्रम राबविते याची कल्पना पालकवर्गाला असावी या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गौरी भोईटे व प्रा. दीपक सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्याशाखांचे सर्व विभाग प्रमुख, महाविद्यालयाचे सर्व अधिष्ठाता, तसेच प्रथम वर्ष विभागात अध्यापन करणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग हे सर्व उपस्थितीत होते. या संपूर्ण कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांचे मोलाचे मागर्दर्शन लाभले.

डॉ. नितीन जाधव यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले व या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थित पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!