विश्व वारकरी सेनेने भजन कीर्तनाच्या परवानगीसाठी इंदापूरच्या तहसीलदारांना दिले निवेदन
भजन कीर्तनास शंभर जणांना परवानगी देण्याची केली मागणी
विश्व वारकरी सेनेने भजन कीर्तनाच्या परवानगीसाठी इंदापूरच्या तहसीलदारांना दिले निवेदन
भजन कीर्तनास शंभर जणांना परवानगी देण्याची केली मागणी
इंदापूर-प्रतिनिधी
विश्व वारकरी सेनेने आज दि.७ रोजी भजन-कीर्तनास शंभर वारकऱ्यांना परवानगी मिळावी या मागणीसाठी इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली.
सदरील मागणीसंदर्भात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दि.२ डिसेंबर पासून विश्व वारकरी सेनेच्या वतीने अकोला जिल्हा कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असून मागणी पूर्ण करावी अन्यथा विश्व वारकरी सेना संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करेल असा इशारा शासनास निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
विश्व वारकरी सेनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष ह.भ.प.प्रमोद शिंदे, उपाध्यक्ष ह.भ.प. दशरथ भोंग, ह.भ.प.तानाजी पाडुळे, सचिव ह.भ.प. मोहन काळे, युवक अध्यक्ष ह.भ.प.धनाजी घोडके यांनी तहसिलदारांना यासंदर्भात निवेदन दिले.