वीजवितरण कंपनीस टाळे ठोकत भाजपाचे हल्लाबोल आंदोलन
अनेक कार्यकर्ते आंदोनात सहभागी
बारामती वार्तापत्र
वीज वितरण कंपनी सक्तीने विज बील वसुली करुन पुरवठा खंडीत करण्याची धमकी देवून वसुली करीत असल्याने या विरोधात बारामती भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज (दि.५) रोजी वीज वितरण कंपनी कार्यालयास टाळे ठोकोत हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारच्या वतीने कोरोना काळामध्ये विज बील माफीचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु विज बील माफी तर सोडाच परंतु मनमानी बिलाची आकारणी करुन महाराष्ट्रातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य सरकारने केले असून ७२ लाख विज ग्राहकांचा पुरवठा खंडीत करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने व महावितरणच्या वतीने घेतला आहे. तो तात्काळ रद्द व्हावा म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते.
यावेळी महावितरणचे ॲडिशनल डेप्युटी इंजिनिअर श्री.गावडे व शहराचे एक्झिकेटिव्ह इंजिनिअर श्री.प्रकाश देवकाते यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी सोबत भाजपाचे शहर सरचिटणीस अॅड.गिरीष देशपांडे, कोषाध्यक्ष संजय रायसोनी,उपाध्यक्ष संजय दराडे, प्रदेश सोशल मिडीया आघाडी प्रमुख अक्षय गायकवाड, मा.अनुसुचित जमाती अध्यक्ष मुकेश वाघेला, मा.अल्पसंख्याक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अल्ताफभाई बागवान, मा.युवक कार्याध्यक्ष अभिजित पवार, सोशल मिडीया प्रमुख सचिन मोरे, अमोल जगदाळे, शरद भगत इ.कार्यकर्ते उपस्थित होते.