वीज पडून दोघांचा मृत्यू : संगोबावाडीवर दुःखाचा डोंगर
या घटनेने संगोबावाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला

वीज पडून दोघांचा मृत्यू : संगोबावाडीवर दुःखाचा डोंगर
या घटनेने संगोबावाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील पणदरे नजिक आज वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. बारामती तालुक्यातील कुरणेवाडी गावच्या हद्दीत सगोबाचीवाडी येथे आज सोमवारी (दि:२०) रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास ही घटना घडली.
बाळासाहेब बंडोबा घोरपडे (वय: ५४ वर्ष) आणि त्यांच्या पत्नी संगीता बाळासाहेब घोरपडे (वय-४४ वर्ष) अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. कुरणेवाडी (बारामती) येथे अचाकन पाऊस कोसळायला सुरूवात झाल्यानंतर शेतकरी दाम्पत्य एका झाडाच्या आडोशाला गेले. पण, त्याच झाडावर वीज कोसळल्याने या दाम्पत्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. या घटनेने संगोबावाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी बारामतीला हलविण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच बाळासाहेब यांचा मृत झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. काही वेळातच संगीता यांचाही मृत्यू झाला. बाळासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी पद्मिनी यांच्यावर बारामतीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.