वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज खोमणे यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस.
कोरोनाग्रस्त रुग्णांची करत आहेत अविरत सेवा.
वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज खोमणे यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस.
कोरोनाग्रस्त रुग्णांची करत आहेत अविरत सेवा.
बारामती वार्तापत्र
जगभरात थैमान घालणाऱ्या कोविड-19 महामारीच्या काळात बारामती तालुक्यातील रुग्णांसाठी अहोरात्र प्रयत्न करणारे रुई कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज खोमणे यांनी व डॉ. खोमणे कट्टर समर्थक ग्रुप कोऱ्हाळे खुर्द ता.बारामती यांच्या तर्फे कोविड सेंटर ग्रामीण रुग्णालय रुई येथील कोरोना बाधित अँडमिट सर्व रुग्णांना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले तसेच श्रावण बाळ विनाअनुदानित अनाथाश्रम इंदापुर यांचे सर्वेसर्वा राजु करडे यांना 12000 रोख मानधन व 100 किलो गहू देऊन वाढदिवस साजरा केला.
यावेळी डॉ.जाधवर,डॉ. शिंदे , वैद्यकीय महाविद्यालय,डॉ .दराडे सर वैद्यकीय अधीक्षक रुई ग्रामीण रुग्णालय व मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर बारामती व रुई येथील कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
बारामती तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 900 वर जाऊन पोहचली असून कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे.आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर, पोलीस, नर्स हे कोविड योध्ये अविरतपणे सेवा करत आहेत.त्यामुळे संपूर्ण देशात यांचा गुणगौरव होत आहे.जगासह देशावर आलेल्या कोरोनाच्या महासंकटात सेवा देता-देता अनेकांना कोरोनाची लागणं होऊन त्यांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे.
अशातच बारामती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज खोमणे हे आपले कर्तव्य पार पाडत कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करत आहेत.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील डॉ.मनोज खोमणे यांचे कित्येक वेळा तोंडभरून कौतुक केले आहे,अशाच धुरंधर व्यक्तिमत्वाचा आज जन्मदिवस आहे. डॉ.मनोज खोमणे यांना जन्मदिनानिम्मित बारामती वार्तापत्र च्या वतीने ही खूप साऱ्या शुभेच्छा