शरद पवारांवर टीका करणाऱ्या पडळकरांच्या प्रतिमेस इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचे जोडे मारो आंदोलन…
त्वरित माफी मागावी अन्यथा आंदोलन तीव्र करू_ प्रदिप गारटकर..
शरद पवारांवर टीका करणाऱ्या पडळकरांच्या प्रतिमेस इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचे जोडे मारो आंदोलन…
त्वरित माफी मागावी अन्यथा आंदोलन तीव्र करू_ प्रदिप गारटकर..
इंदापूर :- (सिद्धार्थ मखरे तालुका प्रतिनिधी)
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांचा निषेध व्यक्त करत त्यांनी त्वरित माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी केली आहे..
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत चुकीचे विधान केल्याच्या निषेधार्थ भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस इंदापूर शहर व तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने इंदापूर पोलिस स्टेशन समोर आज प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाअध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांचा निषेध व्यक्त करत, पड़ळकर यांच्या प्रतिमेस शाई लावून निषेध केला त्यांनी त्वरित माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी केली.. या नंतर गारटकर यांच्या वतीने निवेदन पोलिस स्टेशन चे अधिकारी यांना देण्यात आले..
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,कार्याध्यक्ष अतुल झगडे,माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे,किसनराव जावळे,श्रीधर बाब्रस,राजू चौगुले,अविनाश मोरे, सुनिल अडसूळ,दादासाहेब सोनवणे, आण्णासाहेब धोत्रे, अनिल राऊत,अरबाज शेख,वसंत आरडे आदी मान्यवर उपस्थित होते.