शरद पवारांसह कुटुंबीयांनी साजरा केला पाडवा सण
कुटुंबातील लहान थोर उपस्थित
बारामती वार्तापत्र
राज्यासह देशात कोरोणाचे संकट असल्यामुळे दरवर्षी होणारा पवार कुटुंबियांचा दिवाळी पाडव्यादिवशी कार्यकर्त्यांना भेटण्याचा कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आला होता त्याविषयी पवार कुटुंबीयांनी कार्यकर्त्यांना भेटता येत नसल्याची सल व्यक्त केली होती. संपूर्ण राज्यभरातून पवार कुटुंबीयांवर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोविंद बागेत कुटुंबीयांना भेटण्यासाठी उपस्थित असतात. वर्षातून एकदा येणाऱ्या या सणाला कार्यकर्त्यांना एक पर्वणीच असते कार्यकर्ते या कार्यक्रमाचा आनंद घेऊन भारावून जातात मात्र कोरोणामुळे या सर्व कार्यक्रमांमध्ये खंड पडल्याचे दिसून येते.
पवार कुटुंबीय वर्षातून एकदा दिवाळीच्या सणाला एकत्र येत असतात त्या पार्श्वभूमीवर आज परंपरे प्रमाणे बारामती येथील शरदचंद्रजी पवार यांच्या निवासस्थानी गोविंद बागेत सर्व कुटुंबीय लहान थोरांसह एकत्र जमले होते.
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, सदानंद सुळे यांच्या पत्नी सुप्रियाताई सुळे, आमदार रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार यांनी पाडव्यानिमीत्त औक्षण करून पाडवा सण साजरा केला व संध्याकाळी भाऊबीज होणार आहे.