शरद पवार यांनी बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी सहकुटुंब दिवाळी पाडवा उत्साहात साजरा
दरवर्षीप्रमाणे बारामतीमध्ये एकत्र जमले.
शरद पवार यांनी बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी सहकुटुंब दिवाळी पाडवा उत्साहात साजरा
दरवर्षीप्रमाणे बारामतीमध्ये एकत्र जमले.
बारामती वार्तापत्र
पवार कुटुंबीय दिवाळीच्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे बारामतीमध्ये एकत्र जमले. काल, लक्ष्मीपूजनानंतर गोविंदबागेतील हिरवळीवर एकत्रित येत पवार कुटुंबाने फोटोसेशन केले.प्रतिभा पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल .
दिवाळी पाडव्यानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते बारामतीमध्ये येत असतात. यंदाचा दिवाळी कार्यक्रम अप्पासाहेब पवार सभागृहात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)मंत्रीही उहजर राहतील. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे दुपारी १२ वाजता शरद पवाराना भेटणार आहेत.
गेल्यावर्षी कोरोनामुळे दिवाळी कार्यक्रम रद्द
गेल्यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे बारामतीमधील दिवाळी कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दरवर्षी दिवाळीत भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सहकाऱ्यांनी, हितचिंतक बंधु-भगिनींनी बारामतीला न येता घरुनच शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन पवार कुटुंबाने केले होते.
याबाबत शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि पवार कुटुंबीयांच्यावतीने संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले होते.