राजकीय

शरद पवार हॅट्स ऑफ!, आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचं अप्रूप वाटलं- पंकजा मुंडे

फोन केल्यावर ते कसे प्रश्न सोडवायला मदत करतात, असेही दाखवण्याचा प्रयत्न पंकजा मुंडेंनी केला.

शरद पवार हॅट्स ऑफ!, आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचं अप्रूप वाटलं- पंकजा मुंडे

फोन केल्यावर ते कसे प्रश्न सोडवायला मदत करतात, असेही दाखवण्याचा प्रयत्न पंकजा मुंडेंनी केला.

बारामती वार्तापत्र

भाजपला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राम राम ठोकल्यानंतर आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे एक ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट करत शरद पवारांचे गुणगान गायले आहेत. आपल्या ट्विटमध्ये पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला आहे.
पंकजा मुंडे आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या, @PawarSpeaks hats off . कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले . पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे.

कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा , आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटले . पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे
– Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde)

पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरील दसरा मेळाव्यात देखील शरद पवारांचाही उल्लेख केला. कारण राष्ट्रवादीमध्ये धनंजय मुंडे आहेत. आपले शरद पवारांशी कसे जवळचे संबंध आहेत. फोन केल्यावर ते कसे प्रश्न सोडवायला मदत करतात, असेही दाखवण्याचा प्रयत्न पंकजा मुंडेंनी केला.
आपल्या अनेक जाहिर भाषणात मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री, असे पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवल्यानंतर तिथून त्यांची पक्षात उलटी गिणती सुरू झाली. गोपीनाथ मुंडेंनंतर भाजपमधला बहुजनांचा चेहरा म्हणून पंकजाकडे पाहिले जात होते. पण तरीही फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात पंकजा यांना दुय्यम दर्जाचे समजले जाणारे महिला बाल विकास, जल संधारण आणि ग्राम विकास खाते मिळाले. त्यातही फडणवीसांचा जलयुक्त शिवार हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने पंकजा यांच्याकडचे जल संधारण काढून राम शिंदे यांना देण्यात आल्यामुळे पंकजा विरुद्ध देवेंद्र असा संघर्ष प्रथमच चव्हाट्यावर आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!