शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव .
जनावरे रस्त्यावर,प्रशासनाचे दुर्लक्ष.
बारामती:वार्तापत्र शहरातील अनेक चौकात व भर रस्त्यावर मोकाट जनावरे निवांतपणे बसून रस्ता किंवा चौक अडवतात नागरिक हुसकावून लावण्यास केल्यास त्यांच्या अंगावर जनावरे हल्ला करतात नागरिक जखमी होतात,रस्त्यावरून वाहने चालविणे किंवा एकट्या नागरिकास चालणे शक्य होत नाही केवळ मोकाट जनावरांची दहशत होय.
मोकाट जनावरे रस्त्यावर बसल्यास सर्व रस्त्यावरील वाहतूकिस अडचण निर्माण होते तरी नगरपरिषद प्रशासन ने मोकाट जनावरांचा बंदोवस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहे.