शहाजीनगर येथे नीरा भीमा कारखान्यावरती ऊस तोडणी मजुरांना फराळाचे वाटप
कारखान्यावरती लक्ष्मीपूजन उत्साहात
शहाजीनगर येथे नीरा भीमा कारखान्यावरती ऊस तोडणी मजुरांना फराळाचे वाटप
कारखान्यावरती लक्ष्मीपूजन उत्साहात
इंदापूर: प्रतिनिधी
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथे नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्यावरती ऊस तोडणी मजुरांना दीपावली सणानिमित्त फराळाचे वाटप कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आज शनिवारी (दि.14) करण्यात आले. ऊस तोडणी मजुरांच्या कोप्यावरती हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी ऊस तोडणी मजुरांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, जबीन जामदार, शहाजी पवार, तानाजी नाईक, माणिकराव खाडे, प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील, ऊस तोडणी मजूर उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील यांच्या संकल्पनेनुसार ऊस तोडणी मजुरांना तसेच कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना दीपावली निमित्त फराळ वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. ऊस तोडणी मजुर हे कारखान्यावरती दूरवरच्या गावावरून ऊस तोडणीसाठी आलेले आहेत. या मजुरांना दिवाळी सणाचा आनंद मिळावा, यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते हे दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमापूर्वी नीरा भीमा कारखान्याच्या कार्यालयामध्ये लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते संप्पन्न झाला.सदर प्रसंगी अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.