स्थानिक

शालेय फी साठी तगादा लावला तर शालेय शिक्षण मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही…क्रांतीकारी आवाज संघटनेचा इशारा…

राज्यभर निवेदन देऊन सरकारला इशारा..

शालेय फी साठी तगादा लावला तर शालेय शिक्षण मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही…क्रांतीकारी आवाज संघटनेचा इशारा…

राज्यभर निवेदन देऊन सरकारला इशारा..

बारामती वार्तापत्र

पाठीमागील वर्षी एक ही दिवस शाळा भरली नसताना खासगी शाळांनी शंभर टक्के फी वसुली केली आहे. आता या वर्षी सुद्धा शाळा कधी भरणार आहे. आणि किती दिवस भरणार आहे हे माहिती नसताना अनेक शाळा फी वसुली करत आहेत…अनेक संकटानी पालकांचे कंबरडे मोडले असताना खासगी संस्था चालक नफा कमवण्याच्या मागे लागले आहेत. त्यामुळे खासगी शिक्षण संस्थानकडून फी वसुली झाली तर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा संघटनेने दिला आहे.

 रवींद्र टकले. क्रांतीकारी आवाज संघटना.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु झाल्याशिवाय फी भरू नका असे फसवे आवाहन केल्याचा आरोप संघटनेतील कार्यकर्त्यांनी केला आहे. केवळ संस्थेचे हीत लक्षात घेऊन ही घोषणा करण्यात आली आहे. कारण शाळा सुरु करून फी वसुली केली जाईल आणि नंतर कोरोनाची तिसरी लाट आली तर परत वर्षभर शाळा बंद राहीली तर याची जबाबदारी कोण घेणार. असा सवाल क्रांतीकारी संघणटनेने उपस्थित केला आहे… त्यामुळे सन 2021/22या शैक्षणिक वर्षाची शैक्षणिक फी फक्त दहा टक्के घेऊन उरलेली फी शैक्षणिक वर्ष संपल्यावर घेण्यात यावी अशी मागणी संघटनेने निवेदन देऊन केली आहे. क्रांतीकारी आवाज संघटनेच्या वतीने आज बारामती, सोलापूर, सातारा, नागपूर जिल्ह्यात निवेदन देण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र टकले यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button