शाळांबाबत मोठा निर्णय;राज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद
हा निर्णय सर्व अभिमत, खासगी विद्यापीठांना सुद्धा लागू होणार आहे.
मोठा निर्णय;राज्यातील सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद
हा निर्णय सर्व अभिमत, खासगी विद्यापीठांना सुद्धा लागू होणार आहे.
मुंबई :प्रतिनिधी
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ, महाविद्यालये ही 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. राज्यतील विद्यापीठ, महाविद्यालयातील परीक्षा या 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन घेण्यात येणार असल्याचे देखील ते या वेळी म्हणाले. हा निर्णय सर्व अभिमत, खासगी विद्यापीठांना सुद्धा लागू होणार आहे.
राज्यातील महाविद्यालयांसंदर्भात काल सर्व विभागीयआयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत कोविड 19 संसर्गाबाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या सोबत आरोग्य सुरक्षितते बद्दल सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
उदय सामंत म्हणाले, राज्यातील फक्त अकृषी विद्यापीठ नाही तर इतर खासगी विद्यापीठांना सुद्धा हा निर्णय लागू राहणार आहे. सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय काल मान्य केला आहे. परीक्षांमध्ये अडचणी येत असतील तर महाविद्यालयांनी, विद्यापीठांनी हेल्पलाइन नंबर देण्याचा सूचना दिल्या आहेत. महाविद्यालयासोबत वस्तीगृहदेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे विद्यार्थी परदेशातून व इतर राज्यातून संशोधन करण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी वस्तीगृहाची सोय सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे.
कोरोनाची रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने शाळांबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय. दुसरीकडे वाढता कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे महाविद्यालये बंद केली तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू राहणार आहे.