शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर बारामतीमध्ये धडक कारवाई.
शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर बारामतीमध्ये धडक कारवाई.
तब्बल ६४३ जणांना दंड
बारामती वार्तापत्र
बारामती मधील लॉकडाउन उठल्या नंतर बरेच जण नियमांचे उल्लंघन करत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. त्यामुळे बारामती शहर पोलीस स्टेशन व बारामती नगर परिषदेच्या वतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ६४३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण ७९ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.
बारामती शहर पोलिस ठाण्याचे निरिक्षक औंदुंबर पाटील, सहायक पोलिस निरिक्षक सचिन शिंदे व अश्विनी शेंडगे, फौजदार योगेश शेलार, पोपट नाळे, अनिल सातपुते, दादासाहेब डोईफोडे, गोदेश्वर पवार, पोपट कोकाटे, किशोर वीर, तात्या खाडे, विजय जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली. कोरोना गायब झाला असून, सगळे आबादीआबाद आहे, अशा थाटात अनेक जण विनामास्क फिरून स्वतःला व इतरांनाही धोका निर्माण करू पाहत असल्याचे या कारवाईदरम्यान समोर आल्याची माहिती औदुंबर पाटील यांनी दिली
बारामती शहर पोलीस स्टेशन मास्क कारवाई.
दिनांक :-२२/९/२०२० रोजीची माहिती
विदाऊट मॉस्क केसेस :- ४९६
सोशल डिस्टंन्स न पाळने :- १२
वाहतूक केसेस :- १४५
एकूण दंड आकारणे :- ७९८००/-
बारामती नगर परिषद :- ६४३
एकुण दंड ७९८००/-
एकूण दोन्ही केसेस. :- ६४३
एकूण दंड आकारणे दोन्ही मिळून :- रुपये – ७९८००/-
बारामती तालुका दुसऱ्या क्रमांकावर
बारामती तालुका पोलिसांनीही पोलिस निरिक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या नेतृत्वाखाली बेशिस्त नागरिकांवर गेल्या काही दिवसात मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात विनामास्कच्या केसेसच्या प्रमाणाबाबत बारामती दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता रस्त्यावर थुंकणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.