
शासनाची वाट न पाहता शालेय साहित्य वाटप.
जिल्हा परिषद शाळा मध्ये मोफत शालेय साहित्य वाटप.
बारामती: तालुक्यातील उंडवडी सुपे,उंडवडी क प ,कारखेल, खराडेवाडी येथील विद्यार्थ्यां साठी शाळा सुरू झाल्यावर शैक्षणिक साहित्य ची अडचण येऊ नये म्हणून शुक्रवार 19 रोजी पंचायत समिती च्या माजी उपसभापती सौ शारदा खराडे व बिल्डर असोसिएशनचे चे माजी अध्यक्ष राजेंद्र खराडे यांच्या वतीने मोफत पाठयपुस्तके,गणवेश आदी साहित्य वाटप करण्यात आले. शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यावर मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मध्ये गर्दी होणार ती झाल्यावर गैरसोय होईल म्हणून व तो पर्यंत विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करता यावा या उद्देशाने सदर साहित्य वाटप करत असल्याचे सौ शारदा खराडे यांनी सांगितले. सदर साहित्य वाटप करताना सोशल डिस्टन्स चे पालन करत मास्क व सॅनिटायझर चा वापर करण्यात आला होता. या वेळी राजेंद्र खराडे यांनी आभार व्यक्त केले .
पालकांनी व शिक्षकांनी सुद्धा या उपक्रमाचे स्वागत केले साहित्य वाटप झाल्याने लॉक डाऊन च्या काळात विद्यार्थी घरी जमेल तसा अभ्यास करतील त्या मुळे विद्यार्थ्यां मध्ये उत्सुकता वाढेल असेही पालकांनी सांगितले.
तालुक्यात प्रथमच असे शैक्षणीक साहित्य वाटप केल्या बदल अनेकांनी याचा आदर्श घेण्याचे निश्चित केले आहे