स्थानिक

शासनाचे सर्व नियमांचे पालन करीत बारामती व भोर बससेवेचे वेळापत्रक जाहीर

तीन महिन्यांपासून उभी असलेली लालपरी रस्त्यावर धावणार.

बारामती: गेल्या तीन महिन्यांपासून उभी असलेली लालपरी पुन्हा रस्त्यावर धावणार असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शासनाचे सर्व नियमांचे पालन करीत सहा मार्गांवर बससेवा सुरू केली असल्याची माहिती आगारप्रमुख अनिल गोंजारी यांनी दिली.

बारामती आगारातून सोमवार (दि.15) पासून सहा मार्गांवर बससेवा सुरू केली जाणार आहे. लालपरीची चाके यामुळे फिरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हडपसर,बारामती-जेजुरी, बारामती-निरा, बारामती-भिगवण,बारामती-वालचंदनगर, बारामती-एमआयडीसी याठिकाणी या बस मर्यादित प्रवाशांना घेऊन प्रवास करणार आहेत. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून अनेकांचा कामावर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून बारामती आगाराच्या एसटी बस बंद असल्याने आगाराला करोडो रुपयांचा फटका बसला आहे. कोरोनासंबंधी सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून या बस सुरू करण्यात येणार असून प्रवाशांनीही सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अमोल गोंजारी
यांनी केले आहे.

सोमवारपासून सुटणार्‍या बसचे वेळापत्रक : हडपसर – सकाळी 6,7, दुपारी 2 व 3 वाजता. जेजुरी – सकाळी 8,11, दुपारी 2 व सायंकाळी 5 वा. निरा – सकाळी 7,10, दुपारी 2व सायंकाळी 5 वा. भिगवण – सकाळी 7,9,11, दुपारी 1,2,4 व सायंकाळी 6 वाजता, वालचंदनगर – सकाळी 7,9.30, 11.30, दुपारी 4,4 व सायंकाळी 6 वाजता, एमआयडीसी – सकाळी 8,9,10,11, दुपारी 1,2,3,4 वाजता.

भोर : भोर आगारामार्फत सोमवारपासून तालुकांतर्गत वाहतूक सुरू करण्यात येणार असुन 10 वर्षाखालील व 54 पेक्षा जास्त वयोमर्यादा असणार्‍या नागरीकांना एसटीत प्रवेश नाकारला जाणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक बी.एम.सूर्यवंशी यांनी दिली.

भोर आगारामार्फत राज्य परिवहन महामंडळाच्या निर्जंतुकीकरण केलेल्या बसमधून तालुक्यातील 12 ठिकाणांवर ही वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. एका गाडीत 23 प्रवासी बसविण्यात येणार आहेत. 10 वर्षांखालील आणि 65 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना एसटीत प्रवेश दिला जाणार नाही. एसटीतून प्रवास करण्यासाठी मास्क वापरणे अनिवार्य आहे. तालुक्यातील अतिदुर्गम आणि वाहतुकीची सेवा नसलेल्या ठिकाणी एसटीची वाहतूक सुरू केली जाणार आहे.

भोर आगाराचे वेळापत्रक : भोर ते महुडे- सकाळी 8, 11, दुपारी 1 आणि 3.15., भोर ते कोर्ले- सकाळी 9 दुपारी 1 आणि सायंकाळी 4., भोर ते टिटेघर- सकाळी 10 व 11.30, दुपारी 2 व 4. , भोर ते शिळीम- सकाळी 8 व दुपारी 2., भोर ते वरवडी- दुपारी 12 व 3.,भोर ते भुतोंडे- सकाळी 8 व दुपारी 2., भोर ते कारी- सकाळी 8 व 11 आणि दुपारी 1., भोर ते म्हसर- सकाळी 10 व दुपारी 3., भोर ते दुर्गाडी- सकाळी 8.15 आणि 2.30., भोर ते आंबाडे- सकाळी 10 व दुपारी 1., भोर ते कापूरहोळ- सकाळी 9 व दुपारी 2., भोर ते पिसावरे- सकाळी 9 व दुपारी 1.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!