शासनाने हॉटेल,लॉज,खाद्यय पान व्यवसाय ला मदत करावी: हॉटेल व्यवसायिकांची मागणी.
कोरोना मुळे हॉटेल व लॉज,खाद्यय पान व्यवसाईक, कामगार आर्थिक संकटात.
कोरोना मुळे हॉटेल व लॉज,खाद्यय पान व्यवसाईक, कामगार आर्थिक संकटात
हॉटेल,लॉज साठी बांधण्या साठी काढलेले बँक व खाजगी कर्ज,कामगारांचा पगार,पुरवठा दार यांची बिले देणे आहे,भाड्याची जागा असेल तर मालकाचे भाडे आदी मुळे हॉटेल व लॉज मालक पूर्ण पणे उध्वस्त झाले आहे त्यामुळे शासनाने आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी हॉटेल व लॉज मालक शासनाकडे करीत आहे.
गेल्या ५३ दिवसांपासून ठप्प असलेल्या हॉटेल व लॉज व्यवसायाला बारामतीत घरघर लागली आहे. अजूनही या दोन गोष्टी सुरु करण्यास शासनाने परवानगी दिलेली नसल्याने हॉटेल व लॉजमालक हवालदिल झाले आहेत. लवकर परवानगी मिळाली नाही तर अनेकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ येईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
बारामतीत सर्वच व्यवहार सुरळीत सुरु झालेले असताना व सर्व नियम व अटींचे पालन करण्याची शाश्वती दिलेली असतानाही हॉटेल व लॉजचालकांनाच अजून व्यवसाय सुरु करण्याची परवानगी मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजीची भावना आहे.
बारामती शहर व परिसरात ५० हॉटेल व ढाबे आहेत. चहाविक्रीचीही बारामतीत छोटी मोठी किमान ५० दुकाने आहेत. या दुकानात पाचशेहून अधिक तर हॉटेलमध्ये २५०० कर्मचारी आहेत. या सर्वांवरच सध्या बेकारीची कु-हाड कोसळली आहे. काही कर्मचारी काम सोडून गावाकडे निघून गेले आहेत, उर्वरित कर्मचारीही आता त्याच मानसिकतेत असल्याने हॉटेलचालकांपुढील आव्हान अजूनच वाढले आहे.
बारामतीत साधारणपणे दररोज किमान तीन हजार लोक छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये नाश्ता, जेवण करण्यासाठी जातात. साधारण पाच हजारांपासून ते पन्नास हजारांपर्यंत दररोज हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय होतो. याचा विचार करता गेल्या अडीच महिन्यांच्या कालावधीत कोट्यवधींचे नुकसान त्यांनी सहन केलेले आहे.
लॉजचालकांवरही संकट कायम हॉटेलचालकां सोबतच बारामतीतील 25 लॉजचालकही अडचणीत आले आहेत. जवळपास पाचशेहून अधिक खोल्या रिकाम्या असल्याने त्यांच्यावरही आर्थिक संकट कोसळलेले आहे. परगावाहून बारामतीत येणा-यांची नाश्ता, जेवणासह निवासाचीही तर लग्न बस्त्यासाठी बारामतीत येणाऱ्या अनेक ग्राहकांचीही हॉटेल बंद असल्याने गैरसोय होत आहे.
हॉटेल बरोबर खाद्यय पान व्यवसाईक सुद्धा प्रचंड अडचण आहे,संसार चालविण्यासाठी सुद्धा पैसे नसल्याने शासनाच्या मदत किंवा जीवनावश्यक किट च्या प्रतीक्षेत जीवन जगत असल्याचे पान व्यवसाईक यांनी सांगितले.हॉटेल चे भाडे सुद्धा देऊन शकत नाही त्यामुळे शासनाने मदत करावी अशी मागणी बारामती खाद्य पान व्यवसाईक संघटना च्या वतीने सांगितले.
हॉटेल,लॉज,खाद्यय पान व्यावसायिकांना कोरोनाच्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी तातडीने व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी. सर्व नियमांचे पालन करुन व्यवसाय चालविले जातील, पण आणखी काही दिवस व्यवसाय बंद झाले तर अनेकांवर दिवाळखोर होण्याची वेळ येईल.
– शैलेश साळुंखे व प्रवीण आहुजा, बारामती हॉटेल असोसिएशन.