शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानचा आज पुन्हा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
आर्यन खानने एका अभिनेत्रीसोबत ड्रग्जसंबंधी चॅटिंग केल्याची माहिती कोर्टात दिली आहे
शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानचा आज पुन्हा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
आर्यन खानने एका अभिनेत्रीसोबत ड्रग्जसंबंधी चॅटिंग केल्याची माहिती कोर्टात दिली आहे
प्रतिनिधी
क्रूझ ड्रग केस प्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आर्यनचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम आता अजून वाढला आहे. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालाय दाखल करणार असल्याची माहिती आर्यन खानचे वकील अली काशीद देशमुख यांनी दिली आहे. मुनमुन धामेचा, अरबाज मर्चंट या दोघांचाही जामीन नामंजूर झाला आहे. यामुळे या तिघांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. १३ ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी केल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आपण २० ऑक्टोबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले होते.
आर्यन खान याचे Whats App चॅट कोर्टात सादर केल्याची माहिती एनसीबीने दिली. पोलिसांना आर्यन खान याच्या व्हाँट्सअप चॅटमध्ये कथीतरित्या ड्रग्जशी संबंधीत काही पुरावे सापडले आहेत. तो एका अभिनेत्रीशी बोलताना हे चॅट झाले असल्याचा एनसीबीचा दावा आहे.
आर्यन खानला क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणी २ ऑक्टोबरला अटक करण्यात आली असून सध्या तो जेलमध्ये आहे. आर्यनच्या जामिनावर सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने गेल्या सुनावणीत जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान एनसीबीने जामीनाच्या सुनावणीआधी आर्यन खानने एका अभिनेत्रीसोबत ड्रग्जसंबंधी चॅटिंग केल्याची माहिती कोर्टात दिली आहे. एनसीबीने हे संभाषण कोर्टात सादर केलं आहे. गेल्या सुनावणीत एनसीबीने कोर्टात ही माहिती दिली आहे. या अभिनेत्री आणि आर्यन खानमध्ये अनेकदा ड्रग्जवरुन चॅटिंग झालं आहे. याआधी एनसीबीने आर्यन खानचं काही ड्रग्ज तस्करांसोबत संभाषण झाल्याचे पुरावे दिले होते.