शिक्षकांचे विविध प्रलंबित कामे वेळेत मार्गी लावावेत – दादासाहेब वनवे
शिक्षकांचे विविध प्रलंबित कामे वेळेत मार्गी लावावेत अशी मागणी

शिक्षकांचे विविध प्रलंबित कामे वेळेत मार्गी लावावेत – दादासाहेब वनवे
शिक्षकांचे विविध प्रलंबित कामे वेळेत मार्गी लावावेत अशी मागणी
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीण व शहर यांच्या वतीने डॉ.भाऊसाहेब कारेकर माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांच्या समवेत त्रैमासिक सहविचार सभेचे बुधवारी दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजन करण्यात आले होते.
या सहविचार सभेसाठी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार भगवानराव साळुंखे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुणे विभागाचे संघटन मंत्री रामदास अभंग, पुणे जिल्हाध्यक्ष निलेश काशिद, जिल्हा कार्यवाह महेश शेलार, उपाध्यक्ष भाऊसाहेब खोसे, बारामती तालुका अध्यक्ष दादासाहेब वनवे, कार्यवाहक सोमनाथ जंजिरे तसेच वेतन पथक कार्यालय ग्रामीण व शहरचे अधीक्षक श्री.दत्ता कठाळे व श्री.संजय गंभीरे हे उपस्थित होते.
यावेळी पुणे जिल्ह्यातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी संबंधित कामांबाबत पाठपुरावा करण्यात आला. जसे की दरमहा वेतन एक तारखेला होणे,सेवापुस्तक दुय्यम प्रत कर्मचार्याला मिळणे, सेवाज्येष्ठता यादीमध्ये कर्मचारी ज्या क्रमांकावर आहे त्या पानाची प्रत मिळणे,सेवा हमी कायद्याचे पालन, वैद्यकीय बिले,निवड श्रेणी मान्यता,सर्व प्रकारच्या वैयक्तिक मान्यता विना विलंब मिळणे,सेवानिवृत्त कर्मचारी यांचा प्रस्ताव निपटारा व त्यांचे फायनल पेमेंट लवकर मिळणे याबाबत पाठपुरावा करण्यात आला.
माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर यांनी उत्तम व सकारात्मक प्रतिसाद देत माध्यमिक शिक्षण विभाग व वेतन पथक कार्यालय वेगवान काम करेल याबाबत आश्वस्त केले.
डॉ.भाऊसाहेब कारेकर यांनी पुणे माध्यमिक शिक्षण विभागात केलेल्या प्रशंसनीय सकारात्मक बदलाबाबत तसेच गुणवत्ता संवर्धन अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबवून संपूर्ण महाराष्ट्राला दिशादर्शक उपक्रम दिल्याबद्दल शिक्षक परिषदेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
तसेच शिक्षकांचे विविध प्रलंबित कामे वेळेत मार्गी लावावेत अशी मागणी यावेळी शिक्षक परिषद बारामती तालुकाध्यक्ष दादासाहेब वनवे यांनी केली.