इंदापूर

शिक्षक पतसंस्थेच्या माध्यमातून विकासात्मक कामांवर भर द्यावा,लागेल ती मदत करण्यास कटिबद्ध – मंत्री भरणे

स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलच्या संचालकांचा केला सत्कार

शिक्षक पतसंस्थेच्या माध्यमातून विकासात्मक कामांवर भर द्यावा,लागेल ती मदत करण्यास कटिबद्ध – मंत्री भरणे

स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलच्या संचालकांचा केला सत्कार

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेवर निवडून गेलेल्या संचालक मंडळाने संस्थेच्या माध्यमातून विकासात्मक कामांवर भर द्यावा,त्यासाठी लागेल ती मदत करण्यास आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

भरणेवाडी ता.इंदापूर येथे शुक्रवारी (दि.२९) राज्यमंत्री भरणे यांनी शिक्षक पतसंस्थेवर निवडून आलेल्या स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलच्या संचालकांचा सत्कार केला.

यावेळी बोलताना मंत्री भरणे म्हणाले,तालुक्यातील शिक्षकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून कोट्यावधींची उलाढाल असलेली संस्था तुमच्याहाती सोपवली आहे.संस्थेच्या माध्यमातून शहराच्या ठिकाणी असलेले व्यापारी संकुल,मंगल कार्यालय पारदर्शीपने सांभाळा.यापुढे जाऊन त्याठिकाणी आणखी नवीन उपक्रम राबवता येणे शक्य असून त्यासाठी सर्वांना विश्वासात घेवून निर्णय घ्या.शिक्षकांना केला जाणारा पतपुरवठा सूक्ष्मपणे चालवून सभासदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न करा.यावेळी स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलच्या निवडून आलेल्या २१ संचालकांचा मंत्री भरणे यांनी सत्कार केला.यावेळी नियोजन मंडळ सदस्य सचिन सपकळ,कार्याध्यक्ष अतुल झगडे,शिक्षक संघाचे नानासाहेब नरुटे,नानासाहेब दराडे,दत्तात्रय तोरस्कर,सुरेश भोंग,अनिल जाधव,सहदेव शिंदे,सुहास मोरे,सतीश शिंदे,अनिल रुपनवर,मिलिंद देडगे,फिरोज मुलाणी,सुप्रिया आगवणे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram