स्थानिक

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष मारुतराव चोपडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष मारुतराव चोपडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.

बारामती वार्तापत्र

“श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष मारुतराव चोपडे यांच्या निधनानं पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सहकार चळवळीतलं ज्येष्ठं व्यक्तिमत्वं हरपलं आहे. बारामतीने आपला कर्तृत्ववान सुपुत्र गमावला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, नीरा कॅनाल सोसायटीच्या खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष म्हणून भाऊंनी भागाच्या कृषी, आर्थिक विकासात मोलाचं योगदान दिलं. त्यांचं निधन ही पुणे जिल्ह्याच्या सहकार चळवळीची मोठी हानी आहे. आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. मी दिवंगत भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मारुतराव चोपडे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Related Articles

Back to top button