स्थानिक

शिर्सुफळ येथील बाजारात शेळी-मेंढी आवकेत वाढ

८ लाखाची उलाढाल

शिर्सुफळ येथील बाजारात शेळी-मेंढी आवकेत वाढ

८ लाखाची उलाढाल

बारामती वार्तापत्र 

बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती व शिर्सुफळ ग्रामपंचायतीचे वतीने सुरू झालेल्या शेळी मेंढी बाजारास चांगला प्रतिसाद मिळत असुन सध्या शेळी मेंढीची आवकेत वाढ होत असुन शेतक-यांना चांगला दर मिळत आहे.

त्यामुळे शेतक-यांनी आपली शेळी मेंढी बाजारात विक्रीस आणावी असे आवाहन समितीचे सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी केले आहे. शेळी मेंढी बाजारात आणखी बाजार समितीने सुविधा कराव्यात अशी मागणी माजी जि.प. सदस्य आप्पासो आटोळे यांनी केली आहे.

तसेच ग्रामपंचायती कडुन संपुर्ण सहकार्य व मदत राहील असे सरपंच सौ. जुईताई हिवरकर व सदस्य यांनी ग्वाही दिली.

शुक्रवार १८ एप्रिल २०२५ रोजी एकुण १५० शेळ्या मेंढीची आवक झाली. त्यापैकी ७० ते ८० शेळ्या मेंढ्याची विक्री होऊन साधारण रू. ८ लाखाची उलाढाल झाली. बारामती बाजार समिती मार्फत शिर्सूफळ येथे २८ मार्च २०२५ रोजी शेळी-मेंढी बाजाराचा शुभारंभ झाला आहे. तेव्हा पासुन शेतकरी व व्यापा-यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या बाजारात खरेदी साठी बारामती सह दौंड, भिगवण, हडपसर येथील व्यापारी येत आहेत. बारामती बाजार समिती मार्फत शेळी –मेंढी बाजारात विक्री व्यवस्थेसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविणेत येतील असे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button