इंदापूर

शिवजयंतीच्या कार्यक्रमांवर घातलेले निर्बंध सरकारने तात्काळ उठवावे- अखिल भारतीय मराठा सेवा संघ

शिवजयंतीच्या कार्यक्रमांना सरसकट परवानगी देण्याची मागणी

शिवजयंतीच्या कार्यक्रमांवर घातलेले निर्बंध सरकारने तात्काळ उठवावे- अखिल भारतीय मराठा सेवा संघ

शिवजयंतीच्या कार्यक्रमांना सरसकट परवानगी देण्याची मागणी

इंदापूर:प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी प्रमाणे 19 फेब्रुवारी रोजी साजरी होत असून महाराष्ट्रात लाखो शिवप्रेमींनी सरकारचे सर्व नियम पाळून शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचे नियोजन पूर्ण केले आहे.मात्र महाराष्ट्र सरकारने कोरोनाचे कारण देत यावर्षी शिवजयंतीच्या कार्यक्रमांवर घातलेले निर्बंध तात्काळ मागे घेण्याची मागणी अखिल भारतीय मराठा सेवा संघ इंदापूर यांच्या वतीने करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती राज्यभरात मोठया उत्साहात मर्दानी खेळ, मिरवणुका, ढोल ताशांच्या गजरात साजरी केली जाते. मात्र कोरोना आटोक्यात आला असला तरी कोरोनाचे सावट कायम असल्याकारणाने खबरदारी म्हणून शिवजयंतीसाठी शासनाकडून निर्बंध लावण्यात आले असून जयंती साधेपणाने साजरी करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.मात्र जो फतवा सरकारने काढला आहे.त्याचा अखिल भारतीय मराठा सेवा संघाकडून जाहीर निषेध व्यक्त करून याबाबतचे निवेदन इंदापूर पोलीस स्टेशन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

यावेळी पवन घोगरे,प्रवीण पवार,सचिन जाधव, दत्तात्रय देवकर, नानासाहेब सरडे, रामहरी जाधव, राम आसबे, सचिन सावंत इत्यादी उपस्थित होते.

दरम्यान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळा उदघाटनाला हजारो लोक एकत्र येतात. शरद पवार आझाद मैदानावर हजारो लोकांचे मेळावे घेतात. मंत्री बाळासाहेब थोरात हे इंधन दरवाळीच्या विरोधात मोठे अंदालने करतात. मंत्री छगन भुजबळ व मंत्री विजय वडेट्टीवार हे ओबीसी मोर्चे काढतात. महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांचे सर्व दौरे,मेळावे,सभा,मोचें,इ. पोलीस परवानगी देतात मात्र शिवजयंतीच्या कार्यक्रमाला बंदी घातली जाते. शिवजयंतीच्या कार्यक्रमातून समता,समानता बंधूता प्रस्तापीत केली जाती. परंतू सरकाराच्या म्हणनेनुसार शिवजयंती साजरी केल्याने कोरोना होतो हे चुकीचे असून शिवजयंती कार्यक्रमांवरील सर्व निर्बंध तात्काळ रदद करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!