शिवजयंतीच्या निमित्ताने रमेश शिंदे यांची इंदापूर-शिवनेरी-इंदापूर सायकल वारी
४३० किलोमीटरचा सायकल प्रवास करून शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन

शिवजयंतीच्या निमित्ताने रमेश शिंदे यांची इंदापूर-शिवनेरी-इंदापूर सायकल वारी
४३० किलोमीटरचा सायकल प्रवास करून शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन
इंदापूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त इंदापूर सायकल क्लबचे सदस्य रमेश शिंदे यांनी इंदापूर-शिवनेरी-इंदापूर असा ४३० किलोमीटरचा सायकल प्रवास करून शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.
कोणत्याही प्रकारचा बॅकअप नसताना एकट्याने ४३० किलोमीटर अंतर सायकलवर पार केले. या प्रवासादरम्यान आरोग्यविषयक व पर्यावरण विषय संदेश देत त्यांनी ही वारी पूर्ण केली. याबद्दल इंदापूर सायकल क्लबचे संस्थापक अध्यक्ष सुनील मोहिते यांनी त्यांचे अभिनंदन केले.व यापुढे अशा साहसी सायकल राईड करणाऱ्या सदस्यांना प्रोत्साहन दिले जाईल असे सांगितले.
यावेळी क्लबचे सदस्य दशरथ भोंग, प्रशांत शिताप, स्वप्नील सावंत, संजय शिंदे, ज्ञानदेव डोंगरे, अनिल घेरडे, उमेश राऊत इत्यादी उपस्थित होते.