शिवजयंती निमित्त भिमाई आश्रमशाळेत ब्लँकेटचे वाटप
मधुकर भरणे यांच्या हस्ते वाटप
इंदापूर : प्रतिनिधी
इंडियन फारमर्स फर्टीलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड ( IFFCO) नवी दिल्ली यांच्या वतीने सामाजिक योजनेअंतर्गत मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतीगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे वसतिगृहा मधील विद्यार्थ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मधुकर भरणे व अमोल शेंडगे, बारामती विभाग प्रमुख (IFFCO) यांच्या हस्ते ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी मधुकर भरणेंनी सर्व उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास करत आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना देखील दिल्या.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर मखरे, उपाध्यक्ष तानाजी मिसाळ, संचालक शकुंतला मखरे, सचिव ॲड. समीर मखरे तसेच सामाजिक कार्यकर्ते गोरख तिकोटे, विलास शिंदे, अश्वजीत कांबळे तसेच संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.