हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची घेतली सहकुटुंब भेट 

बारामती येथे गोविंद बागेत पवार व पाटील कुटुंबियांकडून शुभेच्छा!

हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची घेतली सहकुटुंब भेट

•बारामती येथे गोविंद बागेत पवार व पाटील कुटुंबियांकडून शुभेच्छा!

इंदापूर प्रतिनिधी –

बारामती येथील गोविंद बागेत माजी मंत्री व इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांची सहकुटुंब भेट घेऊन दीपावली पाडव्यानिमित्त शनिवारी (दि.2) शुभेच्छा दिल्या व आशिर्वाद घेतले. तसेच या भेटीत पवार व पाटील कुटुंबियातील सदस्यांनी दिवाळीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी खा.सुप्रिया सुळे, आ.रोहित पवार, युगेंद्र पवार आदी पवार कुटुंबियातील सदस्य उपस्थित होते. या भेटीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेसह भाग्यश्री पाटील, निहार ठाकरे, अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील यांनी खा.शरद पवार यांना दीपावलीच्या शुभेच्छा देत आशिर्वाद घेतले. यावेळी खा.शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांचेशी काही काळ संवादही साधला.

खा.शरदचंद्रजी पवार साहेब हे नवीन पिढीसाठी ऊर्जा स्रोत आहेत, महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी ते अहोरात्र काम करीत आहेत, पवार साहेबांचे आशिर्वाद आपणा सर्वांच्या पाठीशी आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी गोविंद बागेमध्ये राज्यभरातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाही दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

___________________________

फोटो

Related Articles

Back to top button