शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी,छत्रपती उदयनराजे यांना गुंडा म्हणणाऱ्या उद्योजकाला कपडे काढून, तोंडाला काळे फासून,धिंडही काढली, पोलीस ठाण्यात नेले! पोलिसांनी केली सात जणांना अटक!
शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्या उद्योजकाला काळ फासलं

शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी,छत्रपती उदयनराजे यांना गुंडा म्हणणाऱ्या उद्योजकाला कपडे काढून, तोंडाला काळे फासून,धिंडही काढली, पोलीस ठाण्यात नेले! पोलिसांनी केली सात जणांना अटक!
शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्या उद्योजकाला काळ फासलं
बारामती वार्तापत्र
इंदापुरातील एका उद्योजकाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात तो उदयनराजे भोसले यांचा उल्लेख गुंड असा करताना पाहायला मिळत आहे. त्यावरुन शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्या उद्योजकाला काळ फासलं, त्याचे कपडे फाडले आणि त्यांची धिंडही काढली.
छत्रपची शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी अपशब्द वापरल्याच्या कारणास्तव शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळे फासले. गुरुवारी (दि.२४) ही घटना घडली. शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अशोक जिंदाल यांच्या तोंडाला काळे फासून त्यांना इंदापूर पोलिस ठाण्यात हजर केले. खासदार उदयनराजे यांच्या विषयी अपशब्द वापरणाऱ्या जिंदाल यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
दरम्यान, जिंदाल यांनी शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचे सांगितले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इंदापूर पोलिसांनी या प्रकरणातील सात जणांना अटक केली आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरी लोणी देवकर येथील एमआयडीसीच्या चौकात भगवे झेंडे घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी दोन आलिशान गाडीतून उतरून जिंदाल यांच्या तोंडाला काळे फासले. हे कार्यकर्ते शिवधर्म फाऊंडेशनचे असून, सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
दरम्यान, जिंदाल यांना संतप्त कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे या व्हिडिओतून दिसत असून, त्यात जिंदाल यांच्यावर काळी शाई फेकून तोंडाला काळे फासल्याचे दिसून येत आहे.
पोलिस ठाण्यात जिदांल यांना घेवून आल्यानंतर कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे सिलेंडर लपवून ठेवल्याचा आरोप केला. या उद्योजकाने बेताल वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.
बेकायदेशीर जमाव जमवला तसेच कोरोना महामारीत तोंडाला मास्क लावले नाही. कोरोना काळातील जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणातून शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
अशोक जिंदाल यांना केलेल्या मारहाण प्रकरणी शिवधर्म फाउंडेशनचे प्रमुख दिपक उर्फ अण्णा सिताराम काटे (वय 28, रा. सरस्वत नगर, इंदापूर ता. इंदापूर, जि. पुणे) अमोल अंकुश पवार (वय 25, रा. गांधी चौक, नवीन बाजारतळ, अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर), कुणाल शिवाजी चव्हाण (वय 33 वर्ष, रा. विजय चौक अकलूज, ता माळशिरस, जि सोलापूर), प्रदीप चंद्रकांत भोसले (वय 24 वर्ष, रा. राऊत नगर, अकलूज, ता माळशिरस, जि सोलापूर), किरण रवींद्र साळुंखे (वय 27 वर्षे, रा. भाग्यनगर, भवानीनगर, ता इंदापूर, जि. पुणे), अक्षय चंद्रकांत चव्हाण (वय 25 वर्ष, श्रीराम नगर, भिगवण रोड, बारामती, ता. बारामती, जि पुणे), सुनील विठ्ठल रायकर (वय 23 वर्ष, राऊत नगर, अकलूज, ता माळशिरस, जि. सोलापूर), 4 ते 5 अनोळखी इसमांवर इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरील सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे हे करीत आहेत.