शिवराज्यभिषेक व सुभेदार सुभानजी बळवंतराव देवकाते यांचा ऐतहासिक सन्मानदिन सोहळा पहिल्यांदा साजरा होणार कण्हेरीच्या मारुती मंदिरात..
कन्हेरी गाव हे सुभेदार देवकाते यांची वतनदारी राहिलेली आहे.

शिवराज्यभिषेक व सुभेदार सुभानजी बळवंतराव देवकाते यांचा ऐतहासिक सन्मानदिन सोहळा पहिल्यांदा साजरा होणार कण्हेरीच्या मारुती मंदिरात..
कन्हेरी गाव हे सुभेदार देवकाते यांची वतनदारी राहिलेली आहे.
बारामती वार्तापत्र
छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक हा संपूर्ण देशासाठी प्रेरणा देणारा दिवस आहे. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा देवून सुभेदार सुभानजी बळवंतराव देवकाते अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये अग्रस्थानी होते हा इतिहास आहे.
त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदु साम्राज्य दिन म्हणुन संपूर्ण देशभर साजरा होत असतो आणि याच दिवशी सुभेदार सुभानजी बळवंतराव देवकाते यांचा हिंदवी राज्य स्थापनेच्या सहभागामुळे ऐतिहासिक सन्मानदिन सोहळा पहिल्यांदाच बारामती तालुक्यातील त्यांच्या समाधी असलेल्या श्री क्षेत्र कन्हेरी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे यासाठी मोठ्या संख्येने सर्वपक्षीय प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
सुभेदार सुभानजी बळवंतराव देवकाते यांचे बारामती तालुक्यातील कन्हेरी गावातील मारूती मंदीरात असलेले महादेवाचे मंदीर हे समाधीस्थळ असुन संपूर्ण समाज बांधवासाठी प्रेरणास्थान आहे. बारामती परिसर व कन्हेरी गाव हे सुभेदार देवकाते यांची वतनदारी राहिलेली आहे.
तरी समितीच्या माध्यमातुन त्या ठिकाणी अभिषेक, व्याख्याने आणि प्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शिवराज्यभिषेक व सुभेदार सुभानजी बळवंतराव देवकाते सन्मानदिन सोहळा तिथीनुसार रविवार ( ता. १२ ) जुलै ला सकाळी १० वाजता बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र कन्हेरी येथील मारुती मंदिरात होणार आहे. तरी या अतिमहत्त्वाच्या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.