शिवसेनेचे माजी खासदार गजानन धरमसी बाबर यांचे निधन
गजानन बाबर यांनी पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेची पहिली शाखा उघडली होती.
शिवसेनेचे माजी खासदार गजानन धरमसी बाबर यांचे निधन
गजानन बाबर यांनी पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेची पहिली शाखा उघडली होती.
पिंपरी – प्रतिनिधी
शिवसेनेचे माजी खासदार गजानन धरमसी बाबर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. आज बुधवारी दुपारी चार वाजता बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 79 वर्षाचे होते. मागील तीन महिन्यांपासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त होते. पोटाच्या विकारामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच मागील दहा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळं त्यांची तब्येत बिघडत गेली. उद्या सकाळी 11वाजता निगडी इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना उभी करण्यात बाबर यांचे मोठे योगदान होते .
असा होता राजकीय प्रवास मधील
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते गजानन बाबर यांनी पिंपरीतील काळभोर नगर येथे शिवसेनेची पहिली शाखा सुरु केली. तिथून पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेच्या वाढीस सुरुवात झाली. गजानन बाबरयांना राजकारणातील एक अभ्यासू , लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जायचे. काळभोरनगर प्रभागातून तीन वेळा नगरसेवक म्हणून ते निवडून आले. त्यानंतर हवेली तालुक्यातून त ते दोन वेळा आमदार म्हणून निवडणून आले. पुढे पूर्वीचा खेड लोकसभा मतदारसंघ रद्द झात्यानंतर तयार झालेल्या मावळ मतदार संघातून गजानन बाबर हे शिवसेनेचे पहिले खासदार म्हणून निवडून आले . त्यानंतर त्यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार आणि विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर बाबर यांनी 2016मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु तेथेही मन रमल्याने त्यांनी 2019 मध्ये पुन्हा शिवसेनेते प्रवेश केला होता.