इंदापूर

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याला धरले धारेवर

वीजबील थकबाकीच्या वसुलीची पद्धत बदलण्याची मागणी

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याला धरले धारेवर

वीजबील थकबाकीच्या वसुलीची पद्धत बदलण्याची मागणी

इंदापूर : प्रतिनिधी

सध्या जगामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे व त्यामुळे सामान्य जनता,शेतकरी मेटाकुटीस आला असतानाच सध्या सगळीकडे वीजबीलांची थकबाकी वसूल करण्यासाठी जोरदार मोहीम महावितरण कडून सुरू आहे. ज्या लोकांनी पैसे भरले आहेत किंवा पूर्वीपासून नियमित पैसे भरत आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा वीज मिळत नाही.त्यामुळे इंदापूर तालुक्यातील वीजबील थकबाकीच्या वसुलीची पद्धत बदलावी अन्यथा महावितरणच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा इंदापूर शिवसेनेकडून देण्यात आला असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याला धारेवर धरत ऑफिसमध्ये घेराव घातला.

सध्या जनावरांच्या पाण्यासाठीची व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची फार मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे.त्याचबरोबर एखाद्या डी.पी वरील अर्धे शेतकरी पैसे भरण्यास तयार असतात तर अर्धे शेतकरी पैसे भरू शकत नाहीत अशा ठिकाणी शेतकर्‍यांमध्ये वाद निर्माण होऊ लागले असून एकट्याने पैसे भरून वीज मिळत नाही म्हणून काही शेतकरी पैसे भरायचे थांबले आहेत.

नुकतेच उजनीतून आवर्तन सोडले त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची पाणी असून हातातोंडाशी आलेली पिके जळू लागली आहेत. तसेच काही डी.पी वरून वाड्या वस्त्यांवर वीज कनेक्शन आहे,अशा डी.पी बंद झाल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे.त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना सर्रास वाढीव बिले आकारली असून ज्या शेतकऱ्यांची 5 एच.पी मोटर आहे त्या शेतकऱ्यांना 10 एच.पी ची विजबीले आली आहेत. अशी सर्व बीले दुरुस्त करून मिळावी तसेच वीज बंद करून थकबाकी वसुली करण्यापेक्षा वीज सुरू ठेवून थकबाकी वसूल करावी व शेतकऱ्यांची होणारी अडवणूक, फसवणूक त्वरित थांबून सर्व जनतेला सहकार्य करावे अन्यथा महावितरण अधिकाऱ्यांच्या विरोधात वेगळा मार्ग अवलंबावा लागेल अशा आशयाचे निवेदन उपकार्यकारी अभियंता उपविभाग महावितरण इंदापूर यांना देण्यात आले आहे.

यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे,जिल्हा समन्वयक भीमराव भोसले,उपजिल्हाप्रमुख संजय काळे, शहर प्रमुख महादेव सोमवंशी,उपतालुकाप्रमुख सुदर्शन भाखरे, माथाडी कामगार पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजू शेवाळे, अमित बामणे, उपशहर प्रमुख बंडू शेवाळे, हेमंत भोसले,गोरख कदम उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!