
शेंडे वस्तीच्या रस्त्याला नऊ वर्षानंतर सापडला मुहूर्त
नागरिकांच्या मागणीला यश
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 येथील शेंडेवस्ती रस्त्याची गेली आठ-नऊ वर्षापासून दैन्यावस्था झाली होती. हा रस्ता करण्यासाठी नागरिकांनी अनेक वर्ष मागणी केली होती. मात्र या रस्त्याला आज मुहूर्त मिळाला आहे.
या प्रभागातील नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्याचे काम नगराध्यक्षा सौ पौर्णिमाताई तावरे यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद ,गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेविका अनिता जगताप, सत्यव्रत काळे, सिद्धनाथ भोकरे, अल्ताफ सय्यद, सविता जाधव, बांधकाम सभापती संतोष जगताप, राजेंद्र बनकर ,मयुरी शिंदे ,निलेश मोरे, पराग गुजर, भाविन गुजर, अमोल वाघमारे, सिद्धार्थ सोनवणे, युवराज चव्हाण,अशोक राऊत, अशोक जगताप, सोमनाथ आटोळे, प्रमोद ठोंबरे ,अरुण पाटोळे ,सागर शीलवंत, विशाल गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
पथदिव्यांचे कामही मार्गी
या ठिकाणच्या नागरिकांच्या मागणीप्रमाणे रस्त्याचे कॉंक्रिटीकरनाचा शुभारंभ झाला. भूमिगत विजेसाठी रस्त्याची खोदाई केली जाते. मात्र रस्त्याचे काम करण्याच्या अगोदरच भूमिगत पथदिव्यांचे काम झाले असल्यामुळे व पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम झाल्यामुळे रस्ते खोदाईचा खर्च वाचणार आहे.