शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचे दुखद निधन
अंत्यविधीसाठी गर्दी न करण्याचे संस्थानचे आवाहन

शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचे दुखद निधन
अंत्यविधीसाठी गर्दी न करण्याचे संस्थानचे आवाहन
बारामती वार्तापत्र
शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचे दुखद निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी मोजक्याच भक्तांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी शेगाव येथे कोणीही गर्दी करु नये, असे आवाहन शेगाव संस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
घराजवळ असलेल्या शेतात होणार अंत्यसंस्कार
शिवशंकर पाटील मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर घरीच उपचार केले जात होते. मात्र, उपचारादरम्यान वयाच्या 82 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. घराजवळ असलेल्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पाटील यांच्याकडून संत गजानन महाराज यांची सेवा झालेली आहे.