शेटफळ हवेली मध्ये 132 किलो गांजा जप्त
दोन आरोपींना ताब्यात घेत गुन्हा दाखल..

शेटफळ हवेली मध्ये 132 किलो गांजा जप्त
दोन आरोपींना ताब्यात घेत गुन्हा दाखल..
इंदापूर प्रतिनिधी –
शेटफळ हवेली (ता.इंदापूर) येथे माल वाहतूक टेम्पोमधून विक्रीकरिता आणलेला सुमारे 23 लाख रुपये किमतीचा 132 किलो गांजा आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी गांजासह नवनाथ राजेंद्र चव्हाण (वय 30 वर्षे, रा. शेटफळ हवेली) व शिवाजी जालिंदर सरवदे (वय 30 वर्षे, रा. नीरा नरसिंहपूर, ता. इंदापूर) या दोन आरोपींना ताब्यात घेत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली. याप्रकरणी इंदापूरचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश गुलाबराव माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि.26) आरोपी 132 किलो गांजा मालवाहतूक टेंपोमध्ये भरून शेटफळ हवेली येथे आले होते. त्यावेळी गुन्हेशोध पथकाने त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला.
याबाबतचा पुढील तपास सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर राऊत करत आहेत.