शेतकरी प्रश्नाबाबत केंद्र सरकारला स्वारस्य नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार
सरकारच्या या वर्तनाचा अजित पवारांनी केला निषेध
शेतकरी प्रश्नाबाबत केंद्र सरकारला स्वारस्य नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार
सरकारच्या या वर्तनाचा अजित पवारांनी केला निषेध
बारामती वार्तापत्र
शेतकरी प्रश्नाबाबत केंद्र सरकारला अजिबात स्वारस्य राहिलेले नाही आठ-दहा वेळा चर्चा केल्या त्याही निष्फळ ठरल्या. लाखाचा पोशिंदा शेतकरी त्याचा हा एक प्रकारे अपमानच आहे .त्यामुळे केंद्राचा मी निषेध करतो असे परखड मत अजित दादा पवार यांनी आज बारामती येथे व्यक्त केले. शारदानगर ,बारामती येथील ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी तंत्रज्ञान सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते.
दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनामध्ये आम्हीदेखील सहभागी होणार आहोत, तसे पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचा पाठिंबा आहे आंदोलनात सहभाग नोंदवत असताना मुंबईमध्ये गर्दी करण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलने करावीत.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी सुरू आहे ज्या महिलेने आरोप केले त्या महिलेवर भाजप तसेच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच विमान कंपनीतील अधिकारी अधिकाऱ्यांनी देखिल आरोप केले आहेत. त्यामुळे याची सत्यता पडताळून पुढील निर्णय घेण्यात येतील.या प्रकरणात पवार साहेब जो निर्णय घेतील तो अंतिम असेल असेही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले.
दिल्लीमधील शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत बोलत असताना खासदार शरद पवार यांनी सांगितले की दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. गहू आणि तांदळाचे उत्पादन जास्त झाल्याने त्याच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा संघर्ष गहू व तांदळाच्या भावाच्या संबंधीचे प्रश्न यामुळेही झालेला आहे.शेतकऱ्यांना गहू थोडा कमी करा आणि फळ अन्नधान्य उत्पादन वाढवा असं सांगितलं होतं, पण त्या लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही.कृषी विज्ञान केंद्राने तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून त्याची लोकांमध्ये माहिती करण्यासाठी सप्ताह आयोजित केला. मागील पन्नास वर्षात दूध फळं पाणी वापर, माती व्यवस्थापन अशा विषयांवर अभ्यास करून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे. नियाम व कृषी विद्यापीठ यांची मदत घेऊन शेतीला आणखी दर्जेदार करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले ते बारामती येथील शारदानगर च्या ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने आयोजित कृषी तंत्रज्ञान सप्ताह च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,जलसंधारण मंत्री जयंत पाटील ,मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ,राज्यमंत्री विश्वजीत कदम ,खासदार सुप्रियाताई सुळे ,आमदार रोहित पवार ,सकाळ उद्योगसमूहाचे प्रतापराव पवार ,कृषी आयुक्त धीरजकुमार, एकनाथ डवले, संतोष भोसले बारामतीच्या नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.