शेतकरी भावांनो, आता हमीभाव नाही, हमखास भाव; विकते तेच पिकवायचे – मुख्यमंत्री
जनसंवादात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकरी भावांनो, आता हमीभाव नाही, हमखास भाव; विकते तेच पिकवायचे अशा शब्दांत धीर दिला.
शेतकरी भावांनो, आता हमीभाव नाही, हमखास भाव; विकते तेच पिकवायचे – मुख्यमंत्री
जनसंवादात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकरी भावांनो, आता हमीभाव नाही, हमखास भाव; विकते तेच पिकवायचे अशा शब्दांत धीर दिला.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
मुख्यमंत्री म्हणाले, संकटे आली. सरकार गप्प बसले नाही. शेतकरी वर्क फ्रॉम होम नाही करू शकत. म्हणूनच शेतकऱ्यांसाठी नवी योजना आणली आहे. शेतकरी अंधारात उडी मारतो. त्याला हे माहिती नसते, निसर्ग त्याच्यावर हसणार आहे की, रुसणार आहे. तरीदेखील वेळप्रसंगी पत्नीचे दागिने मोडून, गहाण ठेवून अगदी आयुष्य गहाण ठेवून तो पीक पिकवत असतो. मात्र निसर्गाने साथ दिली, तर जास्त उत्पानदामुळे भाव मिळत नाही. निसर्गाने झोडपले तर उभे पिक जमीनदोस्त होऊन जातो. त्यामुळे जे पिकेल, तेच विकेल आणि जे विकेल तेच पिकेल ही योजना आणली आहे.
कृषी खाते जगभरातील, देशाचा अभ्यास करेल. कोणते पीक किती विकले जाईल, कोठे विकले जाईल याचा अभ्यास करेल. तसेच बी बियाणे शेतकऱ्यांना दिले जाईल. महाराष्ट्राची ओळख दर्जेदार पीक देणारे राज्य म्हणून केली जाईल. त्यासाठी गटशेती, सामूहिक शेतीसारखे पर्याय आखले जातील. शेतकऱ्यांची साखळी तयार करण्यावर भर राहील. विभागवार शीतगृहांची साखळी तयार केली जाणार आहे. मालवाहतूकीसाठी वेगळ्या उपाययोजना, बाजारपेठा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. मी महाराष्ट्रातला शेतकरी असे अभिमानाने शेतकरी म्हणेल असे वातावरण माझ्या सरकारला तयार करायचे आहे. कृषीप्रधान देशात महाराष्ट्र हे प्रयोगशील राज्य आहे. अधुनिकीकरण हे महाराष्ट्राचा स्थायीभाव आहे. शेतीत आगळीवेगळी क्रांती करायची आहे.