शिवसेनेने भाजप कार्यालयांसमोरील तमाशे बंद करावे अन्यथा तांडव करू -आशिष शेलार
शिवसेनेला दिला घणाघाती इशारा

शिवसेनेने भाजप कार्यालयांसमोरील तमाशे बंद करावे अन्यथा तांडव करू -आशिष शेलार
शिवसेनेला दिला घणाघाती इशारा
इंदापूर : प्रतिनिधी
भाजपा आमदार आशिष शेलार हे मंगळवारी ( दि.२४ ) इंदापूर दौऱ्यावर होते.इंदापूर तालुक्यातील मौजे शहाजीनगर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी खासदार नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता आ.शेलार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. संयम सर्वांनी ठेवला पाहिजे. संयमाची अपेक्षा पक्षाने स्पष्ट बोलून दाखवली आहे. ज्या पद्धतीने झुंडशाही राज्यभर बघतोय. शिवसेनेने हा तमाशा बंद करावा भाजपच्या कार्यालयांवरील तमाशे चालूच राहिले तर भारतीय जनता पार्टी तांडव करेल.
पुढे बोलताना शेलार यांनी नारायण राणे यांच्या अटके संदर्भात जाहीर निषेध व्यक्त करून राज्य सरकारला विशेषता शिवसेनेला गर्भित इशारा देऊ इच्छितो. सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट आम्ही करू असा घणाघात शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.