शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये,,सणसरच्या शेतकऱ्यांनी वीज कंपनीकडे केली मागणी
शासनाच्या परिपत्रकानुसार चालू विज बिल न भरल्यास तोडण्यात येणार

शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये,,सणसरच्या शेतकऱ्यांनी वीज कंपनीकडे केली मागणी
शासनाच्या परिपत्रकानुसार चालू विज बिल न भरल्यास तोडण्यात येणार
बारामती वार्तापत्र
वीज वितरण कंपनीच्या कृषीपंपाचे वीज बिल न भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या डीपी सोडवण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे सणसर तालुका इंदापूर येथे आज वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन शाखा अभियंत्यांना शेतकरी कृती समितीचे सदस्य विशाल निंबाळकर, पाटील यांचेसह शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे
या निवेदनात म्हटले आहे की सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत आहे, तरकारी मालाला बाजारात दर नाही, कारखान्याचा गळीत हंगाम सध्या सुरू आहे डीपी सोडवल्यामुळे कारखान्यास तुटून जाणारा उस जळून जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. शेतकऱ्याचे हाता तोंडाला आलेले पीक जळून जाणार आहे यामुळे वीज कंपनी नक्की काय साध्य करणार आहे असेही या निवेदनात म्हटले आहे.
सध्या उन्हाळा वाढत असल्यामुळे पिकांना पाणी द्यावे लागत आहे आणि अशा परिस्थितीत वीज कंपनी कनेक्शन कट करत आहे. ऊर्जा मंत्र्यांनी वीज पुरवठा खंडित करू नये असे सांगितले आहे मात्र तरीही अधिकारी वीज पुरवठा खंडित करत आहेत तसेच मागील दोन-तीन दिवसांपासून ज्या ठिकाणचे ट्रान्सफार्मर बंद केले आहेत ते सुरु करण्याविषयी वीज कंपनी कुठलीही कार्यवाही अवलंबवत नाही.
त्यामुळे शासनाच्या परिपत्रकामध्ये असलेल्या माहितीविषयी संभ्रम निर्माण होत आहे.वीज कंपनीने कोणत्याही अटी व शर्ती न टाकता विजेचे कनेक्शन पुर्ववत सुरू करणे गरजेचे आहे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी किरण गायकवाड यांचे सह शेतकरी उपस्थित होते
शेतकरी त्याच्या जवळ पैसे आल्यावर नक्की विज बिल भरेल मात्र तो पर्यंत शेतकऱ्याला काही अवधी दिला पाहिजे वीज कंपनीने अचानकच कनेक्शन कट करून ट्रांसफार्मर चा पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करून वीज वितरण कंपनीने कोणत्याही परिस्थितीत विजेचा पुरवठा सुरळीत करावा.
विशाल निंबाळकर ( पाटील )
सदस्य ,शेतकरी कृती समिती, सणसर