शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन जोडा, अन्यथा आंदोलन ! रासपचा इशारा
राष्ट्रीय समाज पक्ष बारामती याच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे

शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन जोडा, अन्यथा आंदोलन ! रासपचा इशारा
राष्ट्रीय समाज पक्ष बारामती याच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे
बारामती वार्तापत्र
राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुक्याच्या वतीने आज एम ए सी बी बोर्ड बारामती ग्रामीण कार्यकारी उप अभियंता मा.धनजय गावडे यांना निवेदन देण्यात आले ,करण काल दुष्काळी पट्यातील पळशी मासाळवाडी, लोणी भापकर या पट्यातील शेती पंपाची विज कनेक्शन तोडण्यात आली, शेतकरीच्या हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्याचे काम हे सरकार करीत आहे, शेतात उभी असलेली पीके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत,उभ्या पीकावर नागर फिरवण्याचे काम सरकार कडून केले जात आहे, एक तर तालुक्याच्या आमदारांना या लोकांना 40 वर्षात पिण्याच्या पाण्याची सोय करता आली नाही, आणी आज कचा कच विज कनेक्शन तोडण्याचे पाप हे सरकार करत आहेत त्या संदर्भात आज राष्ट्रीय समाज पक्ष बारामती याच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे लवकरात लवकर ही वीज कनेक्शन जोडावेत अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देणात आला, या वेळेस रासप तालुका अध्यक्ष अँड.अमोल सातकर, युवक अध्यक्ष लखण कोळेकर, जेष्ठ नेते काकासाहेब बुरूंगले, महादेव कोकरे,चंद्रकात वाघमोडे,अमोल चोपडे,अविनाश मासाळ, किशोर सातकर , अण्णा पांढरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते…