शेतकऱ्यांना दिलासा; पुढील तीन महिने वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय, नितीन राऊत यांची विधानसभेत घोषणा
महावितरण वीज निर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करते. पण, सध्या परिस्थिती बिकट आहे.
शेतकऱ्यांना दिलासा; पुढील तीन महिने वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय, नितीन राऊत यांची विधानसभेत घोषणा
महावितरण वीज निर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करते. पण, सध्या परिस्थिती बिकट आहे.
मुंबईः प्रतिनिधी
शेतकऱ्यांची वीज तोडणी प्रकरणावरुन अधिवेशनात आज विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. यानंतर विधानसभेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी एक मोठी घोषणा करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, आमच्या सरकारने शेतकऱ्यांना प्राथमिकता द्यावी हे उद्दीष्ट समोर ठेवून मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन सांगू इच्छितो की, वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची वीज जोडणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच थकबाकीपोटी शेतकरी, सूतगिरणी, उद्योग यांची वीज कनेक्शन पुन्हा सुरू केली जाईल.
तसेच, आगामी तीन महिने शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे पुढील तीन महिने वीज तोडणी करणार नाही. महावितरणची आर्थिक परिस्थिती पाहता सर्वानी वीज बिल भरून सहकार्य करा, असं आवाहनही त्यांनी केलं.
देशात आणि राज्यात विजेचा तुटवडा झाला तरी लोड शेडिंग होऊ दिला नाही. शेतकऱ्यांची मागणी चा विचार करतो, पण महावितरण चा विचार करावा लागतो.
शेतकऱ्यांची वीज तोडणी आम्ही थांबवत आहोत. वीज ग्राहकांना विनंती आहे… आम्ही सवलती देत असलो तरी तुम्ही तुमची बिले वेळेवर भरा असंही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.