शेतकऱ्यांनी जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवावा -बि.एस.रुपनवर
हिंगणेवाडी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
शेतकऱ्यांनी जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवावा -बि.एस.रुपनवर
हिंगणेवाडी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
बारामती वार्तापत्र
जमीन ताकदवान बनवायची असेल तर त्यामध्ये जिवाणूंची संख्या वाढली पाहिजे जिवाणूंची संख्या वाढल्यास जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो त्यामुळे शेतकऱ्याला उत्पन्नात हमखास वाढ होते सेंद्रिय कर्ब व जिवाणूंचा ऱ्हास झाल्यामुळे जमीन नापीक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढीस लागले आहे. यासाठी माती परीक्षण करून आपल्या जमिनीत कोणत्या घटकांची कमतरता आहे त्याप्रमाणे पिकाला योग्य प्रमाणात खताचा पुरवठा करता येतो कोणती खते किती मात्रेत वापरावे हे समजते त्यामुळे अनावश्यक उत्पादन खर्चातही बचत होते कारण आपण फक्त पिकाला उपयुक्त असलेली खते जमिनीत टाकतो त्याचबरोबर सेंद्रिय कर्ब वाढीसाठी आपण शेणखत, कोंबडी खत ,गांडूळखत वापरून सेंद्रिय कर्ब वाढवू शकतो ताग ,धैंच्या ही हिरवळीची पिके घेऊन 45 दिवसांनी फुलोऱ्यात आल्यावर ती जमिनीत गाडावीत त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो व शेणखताला ही पर्याय होऊ शकतो प्रत्येकाने आपल्या जमिनीची आरोग्य पत्रिका तयार केल्यास उत्पन्नात वाढ तर होतेच पण जमिनीचे आरोग्यही चांगले राहते असे रुपनवर यांनी सांगितले यावेळी हिंगणेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास कदम यांच्या मक्याच्या प्लॉटला शेतकऱ्यांनी भेट देऊन त्याविषयीची माहिती घेतली या कार्यक्रमासाठी बँक ऑफ महाराष्ट्र भिगवण च्या ग्रामीण विकास केंद्राचे श्री लोखंडे सर ,मंडल कृषी अधिकारी सणसर चे माळवे साहेब , यांनी विविध शासकीय योजनांविषयी माहिती दिली सचिन मोरे कृषी सहाय्यक यांनी मका पिकावरील लष्करी अळी ,लष्करी अळीचे नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन हिंगणेवाडी चे कृषी सहाय्यक सचिन चितारे कृषी पर्यवेक्षक सुतार साहेब यानी केले.
कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सदस्य श्रीनिवास कदम, संतोष काळे ,सुमित यादव ,अनिल काळभोर ,युवराज सरक, आबा खरात ,प्रशांत माने, सपकळ साहेब, संजय थोरात ,डॉक्टर घाडगे ,भालचंद्र घाडगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते