शेतकऱ्यांविषयी कळवळा असल्याचा ढोंगीपणा हर्षवर्धन पाटलांनी करू नये ; मंत्री भरणेंवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रतिउत्तर
प्रत्येक वेळी जशास तसे उत्तर देण्याचा दिला इशारा
शेतकऱ्यांविषयी कळवळा असल्याचा ढोंगीपणा हर्षवर्धन पाटलांनी करू नये ; मंत्री भरणेंवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रतिउत्तर
प्रत्येक वेळी जशास तसे उत्तर देण्याचा दिला इशारा
इंदापूर : प्रतिनिधी
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी वीज तोडणी संदर्भातील रस्ता रोको आंदोलनावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे कमिशन एजंट आहेत असे म्हणत त्यांच्या कार्य पद्धतीवर जोरदार टिकास्त्र सोडले होते. त्याला अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे.
कोकाटे म्हणाले की,ढोंगीपणा करावा तर हर्षवर्धन पाटलांनीच, सलग २० वर्ष हर्षवर्धन पाटलांनी मंत्रीपदे भोगली. एच. डी. मोटार सायकल पासूनचा आपला प्रवास आज बी.एम. डब्ल्यू / इंडिवर अशा अनेक गाडया आपल्याकडे कुठून आल्या. एकेकाळी एच.डी.गाडीला रॉकेल नसलेले सुध्दा या तालुक्यातील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी आमच्या नेत्यावर कमिशनची भाषा करू नये, ज्यावेळेस तुम्ही मोटार सायकल घेऊन फिरत होता तेव्हा भरणे कुटुंबियाकडे ७०० एकर शेती होती. त्यामुळे तुमच्याच बुडाखाली अंधार असल्याने तुम्ही कमिशनची भाषा करू नये.
आपण तालुक्यातील सुसंस्कृत नेते स्वयंमघोषीत आहात. हे आपण दाखवून दिले आहे. आमच्या नेत्याची विकासकामे बघून तुमची जिभ घसरू लागलीय का? का आपण विकासकामांचा दसका घेतला आहे. आपण इतिहास वाचा, कर्मयोगी शंकरराव भाऊंच्या आदेशानुसार कारखाना अडचणीत आहे, असे कर्मयोगी भाऊंनी सांगितले असता त्यांचा शब्दाखातर सुमारे ३ कोटी रूपयांची एफ.डी. इंदापूर सहकारी साखर कारखान्यात भरणे कुटूंबियांनी ठेवली होती. आणि आज आपण विचारता एवढा पैसा आला कुठून?
आज आपण निष्क्रियतेच्या गप्पा करत आहात, परंतु तुमच्या १९ वर्षांच्या मंत्रीपदाच्या काळातील निष्क्रियता बघुनच जनेतेन तुम्हाला विधानसभेला सलग २ वेळा घरी बसविले आहे. तरी तुम्हाला राज्यमंत्री भरणेंची क्रियाशिलता दिसत नाही.
तुम्ही तालुक्यातील लोकांना सांगता १३०० कोटी रूपये आणले म्हणजे विकासकामे चालू आहेत, हे आपण मान्य केलेच. मग कुठतरी चांगल्या कामाला गालबोट लावण्यासाठी आपली जिभ वायफळ बडबडु नये, अन्यथा आपल्याला प्रत्येक वेळी जशास तसे उत्तर दिले जाईल व आपली पात्रता आम्ही तालुक्यापुढे उघड करू असा इशाराही कोकाटे यांनी दिला आहे.
यावेळी अतुल झगडे, सतीश पांढरे, नवनाथ रुपनवर, नानासाहेब नरूटे, रमेश पाटील, संजय देवकर, प्रफुल पवार, अक्षय कोकाटे, नानासो भोईटे रमेश पाटील, दत्तात्रय मोरे, दत्ता बाबर, मारुती वाघमोडे उपस्थित होते.