शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.
उजनी धरणाचा पाणीसाठा प्लस मध्ये.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरण प्लस मध्ये आले आहे.
उजनी धरणावर सोलापूरसह पुणे , नगर जिल्ह्यातील शेतकरी अवलंबून आहेत त्यामुळे धरण केंव्हा शंभर टक्के भरते याकडे या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. पुणे जिल्ह्यातील धरणे अद्याप भरली नाहीत त्यामुळे त्या धरणातील पाणी उजनीमध्ये येण्यास अद्याप वेळ लागणार आहे. काल रात्रीपासून धरण प्लस मध्ये येण्यास सुरवात झालीय. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
13 मे 2020 ला मायनस मध्ये गेलेले धरण काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्लस मध्ये येण्यास सुरुवात झाली आहे.
उजनी धरणातील आज रविवारी ची सकाळी सहा वाजण्याची पाण्याची स्थिती
– पाणीपातळी : 491.040 मीटर
– एकूण पाणीसाठा : 1804.80 द. ल. घ. मी.
– टक्केवारी : 0.13 टक्के
– एकूण पाणीसाठी :- 63.73 टी एम सी