शेतकऱ्यांसाठी दिलासा दायक बातमी..
उजनी धरणात तेरा दिवसात ६.१८ टक्क्याने वाढ..
भीमा नदीच्या खोऱ्यात पर्जन्यामुळे उजनीची टक्केवारी वाढू लागली
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
पुणे सोलापूर व नगर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या व पाणी साठ्यात एक नंबर ला असलेल्या उजनी धरणात गेल्या तेरा दिवसात ६.१८ टक्क्याने वाढ झाली आहे.
उन्हाळ्यात ज्यावेळी सोलापूर जिल्ह्यास पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले होते त्यावेळी उजनी धरण माईनस (वजा) मध्ये गेले होते १३ जून रोजी जेव्हा पाणी बंद करण्यात आले
त्यावेळी उजनी धरणात उपयुक्त साठा वजा ९.६३ टीएमसी होता तर उपयुक्त पाण्याची एकूण टक्केवारी वजा १७.९७ एवढी होती.
मागील काही दिवसात भीमा खोऱ्यात चांगला पाऊस झाला आहे. पुणे परिसर तसेच भीमा नदीच्या खोऱ्यात पर्जन्यामुळे उजनीत दौंडजवळून पाणी मिसळू लागले आहे उजनी धरणात दौंड जवळून पाण्याची आवक होत असून यामुळे गेल्या काही दिवसात उजनी ६.१८ टक्क्यांनी पाणी साठा वाढला आहे.
त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे..