शेतकऱ्यांसाठी महावितरण कंपनीने हप्ते बांधुन द्यावेत – ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथे बोलताना महावितरण अधिकाऱ्यांना सूचना

शेतकऱ्यांसाठी महावितरण कंपनीने हप्ते बांधुन द्यावेत – ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथे बोलताना महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना
इंदापूर : प्रतिनिधी
कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण आहे. महावितरण ही सरकारी कंपनी आहे व सरकारची भुमिका ही शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे. महावितरणच्या आधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन न तोडता शेतकऱ्यांना हप्ते बांधुन द्यावेत तसेच पाणी पुरवठयाचे व स्ट्रीट लाईटचे कोणतेही वीज कनेक्शन तोडु नये अशी सुचना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथे बोलताना व्यक्त केली.
महावितरणच्या वतीने उभारण्यात आलेल्या ३३ केव्ही उपकेंद्राचे उद्घाटन मंगळवारी ( दि.१४ ) ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे हस्ते व खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या वेळी ते बोलत होते.
या वेळी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,ज्या शेतकऱ्यांकडे आर्थिक तरतुद आहे त्यांनी वीज बील भरावे परंतु ज्याकडे आर्थिक तरतुद नाही अशा शेतकऱ्यांसाठी महावितरण कंपनीने हप्ते बांधुन द्यावेत व वीज तोडु नये.कोरोनाचे संकट असतानाही खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे तालुक्याला निधीची कमतरता भासली नाही.
यावेळी बोलताना खा.सुप्रिया सुळे यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुणे जिल्हा परिषदेतील कामामुळेच राज्यमंत्री भरणे आमदार झाल्याचे सांगितले. इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निधीची कमतरता भासणार नाही असेही याप्रसंगी बोलताना खासदार सुळे यांनी सांगितले.
यावेळी पुणे जिल्हा विद्युत वितरण समितीचे सदस्य स्वप्नील सावंत,इंदापूर विद्युत वितरण समितीचे तालुका अध्यक्ष अतुल झगडे,जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर,जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, वैशाली पाटील, सागर मिसाळ, हनुमंत कोकाटे,प्रताप पाटील, सतीश पांढरे, विष्णू पाटील, सचिन खामगळ, शुभम निंबाळकर, सारिका लोंढे,सरपंच शिवाजी कन्हेरकर उपस्थित होते.