शेती विकासाकरीता कृषी विभागाचे मार्गदर्शन महत्वाचे – अंकिता हर्षवर्धन पाटील.
कृषी विभागामार्फत बावडा येथे कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन...
शेती विकासाकरीता कृषी विभागाचे मार्गदर्शन महत्वाचे – अंकिता हर्षवर्धन पाटील.
कृषी विभागामार्फत बावडा येथे कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन…
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी १ जुलै ते ७ जुलै कृषी संजीवनी सप्ताहाचे बावडा ता.इंदापूर येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना बावडा लाखेवाडी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी वरील मत व्यक्त केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरी लक्षात घेऊन स्व. वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागाच्या मार्फत दरवर्षी एक जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात येतो. माजी मुख्यमंत्री स्व.वसंतरावजी नाईक यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये हरितक्रांती केली व राज्यात अन्न धान्य बाबतीत स्वयंपूर्ण केले.
या वर्षी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना उत्पन्न वाढावे यासाठी १ जुलै ते ७ जुलै कृषी संजीवनी सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. सदर साप्ताहिक यामध्ये कृषी विभागामार्फत गावोगावी कार्यक्रम घेऊन विविध योजनांविषयी फळबागा लागवड विषयी पेरणी बाबत व विविध पिकांचे एकात्मिक कीड व्यवस्थापन बद्दल बाबतीत शेतकऱ्यांना माहिती दिली जात आहे. मंडल कृषी अधिकारी, बावडा कार्यालयामार्फत हा कार्यक्रम बावडा येथे आयोजित करण्यात आला होता. ह्या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थितीत राहून अधिकारी व शेतकरी यांच्या समवेत संवाद साधला मार्गदर्शन केले.
अंकिता पाटील म्हणाल्या की,’ कृषी विभाग चांगले काम करत असून कृषी विभागातील अधिकारी,कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. कृषी विकासात कृषी विभागाची भूमिका अतिशय महत्त्वाची असून यामुळे शेतकरी वर्गाला अधिकचे उत्पन्न मिळेल.’अंकिता पाटील यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
मंडल कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना व प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेणे बाबत उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले. कृषी सहायक हनुमंत बोडके यांनी ऊस पिकाचे कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेणे बाबत मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच किरण पाटील ,उपसरपंच निलेश घोगरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब कोकणे, मंडळ कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे, कृषी अधिकारी सतीश महारनवर, कृषी पर्यवेक्षक देवानंद कोरटकर , कृषी सहाय्यक हनुमंत बोडके आणि अन्वर कलाल उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक अन्वर कलाल यांनी केले.