श्रायबर डायनॅमिक्स चा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आदर्शवत :अजित पवार
रुग्णांना सरळ,शुद्ध ऑक्सिजन मिळणार ,वेळ व पैसा वाचणार

श्रायबर डायनॅमिक्स चा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आदर्शवत :अजित पवार
रुग्णांना सरळ,शुद्ध ऑक्सिजन मिळणार ,वेळ व पैसा वाचणार
बारामती वार्तापत्र
रुग्णांना कमी वेळेत शुद्ध व जास्त ऑक्सिजन मिळणारा देशी बनावट चा कमी खर्चात व अल्पावधीत प्रकल्प श्रायबर डायनॅमिक्स डेअरी ने तयार करून आदर्शवत समाज कार्य कोरोनाच्या महामारीत केले आहे असे कौतुकास्पद प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
शनिवार 29 मे रोजी महिला ग्रामीण रुग्णालय बारामती येथे श्रायबर डायनॅमिक्स डेअरी कंपनीने हवेतून ऑक्सिजन तयार करणे म्हणजे ‘ऑक्सिजन निर्मिती संच ‘ वैदकीय वापरासाठी कार्यान्वित केला त्याचा उदघाटन सोहळा अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी कंपनीचे रिजनल ऑपरेशन्स मॅनेजर जितेंद्र जाधव,बिझनेस स्पोर्ट मॅनेजर मंजुश्री चव्हाण,हनुमंत जगताप,हेमंत चव्हाण ,रवींद्रनाथ मिश्रा,रावसाहेब मोकाशी,वीरेंद्र गायकवाड,विनायक शेटे,समीर हरुगडे,चंद्रकांत दलाल व कर्मचारी संघटना अध्यक्ष नानासाहेब थोरात आणि प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,वैदकीय अधीक्षक डॉ सदानंद काळे,उपधीक्षक डॉ बापूसाहेब भोई,तालुका वैदकीय अधिकारी डॉ मनोज खोमणे, डॉ चंद्रकांत म्हस्के,ऑक्सिजन प्लांट प्रमुख डॉ दिनेश वानखेडे व नवरसेवक किरण गुजर,गटनेते सचिन सातव,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, बिमा उद्योजक संघटना अध्यक्ष धनंजय जामदार ,सचिव शरद सूर्यवंशी व इतर मान्यवर उपस्तीत होते.
सदर प्रकल्प कंपनीच्या सर्व अभियंत्यांनी अहोरात्र परिश्रम करून 15 दिवसात पूर्ण केला आहे सरासरी एकाचवेळी 7 ते 8 रुग्णांना शुद्ध ऑक्सिजन 24 तास डायरेक्ट मिळणार आहे,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन चा तुटवडा भासत असल्याने सामाजिक बांधीलकी म्हणून सदर प्रकल्प उभा करून दिला आहे असे रिजनल ऑपरेशन्स मॅनेजर जितेंद्र जाधव यांनी सांगितले.
खाजगी कंपनीने पुढाकार घेऊन कमी कालावधीत सुरू केलेला पूर्ण देशी बनावट व तंत्रज्ञान चा ऑक्सिजन निर्मिती प्लांट हा रुग्णांसाठी वरदान ठरेल असे मत सिल्व्हर ज्यूबली रुग्णालय चे वैदकीय अधीक्षक डॉ सदानंद काळे यांनी सांगितले.