श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे घंटानाद आंदोलन.
धार्मिक संघटनांसह भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.
श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे घंटानाद आंदोलन.
धार्मिक संघटनांसह भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.
इंदापूर:-प्रतिनिधी
‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशी हाक देत आज राज्यभर ठिकठिकाणी घंटानाद आंदोलनाला सुरुवात झाली आहे.इंदापूर तालुक्यातील निरा आणि भिमा नदी तीरावरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मी- नृसिंह मंदिरा समोर महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले.
श्री लक्ष्मी- नरसिंह देवस्थान हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आहे.यावेळी बोलताना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारकडे इतर सर्व बाबींसाठी वेळ आहे. मात्र मंदीर उघडण्यासाठी सरकारकडे वेळ नाही.अशी खोचक टीका करत राज्य शासनाला मंदिर उघडण्यास भाग पाडू, असा इशारा दिला.
राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढला असला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. अशात आता राज्य अनलॉक होण्याच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे भाजपने बंद असलेली मंदिरे उघडण्याची मागणी उचलून धरली आहे.
यावेळी इंदापूर तालुका भाजपचे नूतन अध्यक्ष शरद जामदार, तानाजी थोरात, मारुती वनवे, ह.भ.प.अंकुश रणखांबे, सचिन सावंत यांची भाषणे झाली. या आंदोलनामध्ये नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, युवराज म्हस्के, महेंद्र रेडके, महादेव घाडगे, किरण पाटील, श्रीमंत ढोले, अमरसिंह पाटील, मनोज पाटील, राम आसबे, हरिभाऊ घोगरे, बाळासाहेब मोहिते, नाथाजी मोहिते, आण्णा काळे, राजेंद्र मोहिते, हनुमंत काळे, संतोष मोरे, विलास ताटे, किशोर मोहिते, पवन घोगरे, सुभाष काळे, शंकर घोगरे, प्रदीप बोडके, अभय वांकर, भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ व धार्मिक क्षेत्रातील मंडळींनी सहभाग घेतला.